By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:31 IST
1 / 9रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अपूर्वाने १४ फेब्रुवारीला तनुज गोवलकरसोबत लग्न करत नव्याने संसाराला सुरुवात केली आहे. 2 / 9लग्नाचे फोटो शेअर करत तिने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता अपूर्वाने तिच्या नवऱ्यासोबतचा विलक्षण योगायोग सांगितला आहे. 3 / 9अपूर्वा २०२४ मध्ये सिंगापूरला फिरायला गेली होती. तिथल्या काही प्रेक्षणीय स्थळांना तिने भेटी दिल्या होत्या. याचे फोटोही तिने शेअर केले होते. 4 / 9२०२५ मध्ये अपूर्वाचा नवरा तनुजही सिंगापूरला गेला होता. विशेष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अपूर्वाने फोटो काढले होते. त्याच ठिकाणी त्या सेम स्पॉटवर त्याने देखील फोटो काढले. 5 / 9हे सर्व फोटो शेअर करत अपूर्वाने या अद्भुत योगायोग बद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. 6 / 9२०२४ मध्ये मी सिंगापूरला गेले होते. लग्नानंतर मी तनुजचे सिंगापूरचे फोटो पाहिले. तो २०२५ मध्ये गेला होता. 7 / 9सेम स्पॉट, सेम फ्रेम, सेम रस्ते फक्त वर्ष वेगळं. आम्ही सेम ठिकाणी उभे होतो. पण ती वेळ आमची नव्हती. 8 / 9कधीकधी डेस्टिनी दोन soulmate ला पुन्हा पुन्हा भेटण्याची संधी देत असते. योग्य वेळ येईपर्यंत, तुम्ही पूर्णपणे तयार होईपर्यंत आणि तुमचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होईपर्यंत...9 / 9कदाचित यालाच दोन आत्म्यांचा एक प्रवास असं म्हणत असतील.