By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:07 IST
1 / 8'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. तिच्या सौंदर्यामुळे भल्याभल्यांना घायाळ करते. वयाच्या ४० व्या वर्षीही तिचा फिटनेस, चेहऱ्यावरचा ग्लो तसाच आहे.2 / 8अंकिता आणि विकीची जोडी 'बिग बॉस' मुळे खूपच प्रसिद्ध झाली. यानिमित्ताने सर्वांना अंकिताच्या नवऱ्याबद्दल म्हणजेच विकी जैनबद्दलही समजलं. अंकिताची सासूही प्रसिद्ध झाली.3 / 8पण तुम्ही कधी अंकिताच्या जाऊबाईंना पाहिलंय का? अंकिताची जाऊ रेशू जैन (Reshu Jain) दोन मुलांची आई आहे. मात्र सौंदर्यात तिचीही स्तुती करावी तितकी कमीच आहे.4 / 8रेशू ही विकी जैनचा मोठा भाऊ विशाल जैनची पत्नी आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रेशूने सोशल मीडियावर कुटुंबासोबतचे अनेक फोटो शेअर केलेत. 5 / 8 रेशूने अंकितासोबतचे फोटोही पोस्टही केले आहेत. यावरुन अंकिताचा जावेसोबतही चांगला बाँड आहे हे दिसून येतं.6 / 8रेशू जैन दिसायला सुंदर, फीट आहे. अंकिताच काय कोणाही अभिनेत्रीला टक्कर देईल असं तिचं सौंदर्य आहे. 7 / 8रेशू जैन ही फिजीओथेरपिस्ट आहे. शिवाय ती बिलासपूर येथे 'बिर्ला ओपन माइंड्स् इंटरनॅशनल स्कुलमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर पदावर आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम बायकोमध्ये ही माहिती दिली आहे.8 / 8रेशू सोशल मीडियावर सक्रीय आहे. मुलांचे कॉमेडी रील्सही ती शेअर करत असते. तसंच जैन धर्मातील रिती-रिवाजांचंही ती या माध्यमातून दर्शन घडवते.