Join us

इतकी कशी ग्लो करते अंकिता लोखंडेची स्कीन? अभिनेत्रीने सांगितलं हनुमान चालीसा सिक्रेट, म्हणाली- "चांदीच्या ग्लासात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:50 IST

1 / 9
अंकिता लोखंडे अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते. चाळीशी गाठलेली अंकिता अजूनही तितकीच सुंदर दिसते.
2 / 9
अंकिताची स्किन खूपच ग्लो करते. पण, अभिनेत्रीच्या सौंदर्याचं सिक्रेट तुम्हाला माहीत आहे का? अभिनेत्रीने स्वत:च याचा खुलासा केला आहे.
3 / 9
अंकिता रोज सकाळी उठून एक खास पाणी पिते. यामध्ये रात्री मेथीचे दाणे आणि दालचिनी भिजत ठेवलेले असतात. आणि जीरा, बडीशेप आणि ओवा यांची पावडरही ती सकाळी खाते.
4 / 9
याशिवाय अंकिता सकाळी केशरचं पाणीही पिते. त्यासोबत ती विटामीन सी ही टॅब्लेटही घेते.
5 / 9
त्यासोबतच बीट, नारळाचे पाणी आणि वेगवेगळ्या बीया असलेलं ज्यूस सकाळी उठल्यावर अंकिता पिते. त्यामुळे तिच्या स्किन आणि आरोग्यालाही त्याचा फायदा मिळालेला आहे.
6 / 9
एक विशिष्ट प्रयोगही अंकिता करते. याबद्दल तिने सांगितलं आहे. ती म्हणाली, 'माझ्याकडे एक चांदीचा ग्लास आहे. त्यात केशरचं पाणी मी बनवून ठेवते'.
7 / 9
'सकाळी बाल्कनीमध्ये जाऊन मी फक्त पॉझिटीव्ह गोष्टी बोलते आणि ते पाणी पिते. यामुळे एनर्जी मिळते'.
8 / 9
'त्यानंतर मी अंघोळ करते आणि देवाची पूजा करते. मी रोज राम रक्षा आणि हनुमान चालीसा वाचते'.
9 / 9
'देवघरात मी पाणी ठेवलं आहे. ते पाणी मी बॉटलमध्ये घेते आणि दिवसभर पिते. त्यामुळे मला एनर्जी मिळते', असंही तिने सांगितलं.
टॅग्स :अंकिता लोखंडेसेलिब्रिटी