Join us  

Akshaya-Hardik Wedding Photos : शुभमंगल सावधान! अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीनं बांधली लग्नगाठ, पाहा शाही विवाहसोहळ्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 12:42 PM

1 / 9
राणादा आणि पाठक बाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर आज (२ डिसेंबर २०२२) विवाहबंधनात अडकले आहेत. (Photo Credit : Girish Katkar Photography)
2 / 9
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा लग्नसोहळा अगदी शाही अंदाजात पार पडला. (Photo Credit : Girish Katkar Photography)
3 / 9
पुण्यातील सिद्धी गार्डन या ठिकाणी हा विवाहसोहळा संपन्न झाला. (Photo Credit : Girish Katkar Photography)
4 / 9
या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. (Photo Credit : Girish Katkar Photography)
5 / 9
लग्नाच्या विधीच्या वेळी अक्षया आणि हार्दिक पारंपारिक वेशात पाहायला मिळाले. (Photo Credit : Girish Katkar Photography)
6 / 9
हार्दिकने अक्षयाला मंगळसूत्र घालताना कॅमेऱ्यात टिपलेला हा सुंदर क्षण (Photo Credit : Girish Katkar Photography)
7 / 9
अक्षयाने लाल रंगाची नववारी साडी, कपाळावर चंद्राची कोर, नाकात नथ, आंबाडा आणि गळ्यात साजेसा नेकलेस घातलेला पाहायला मिळाला. या लूकमध्ये वधू खूपच सुंदर दिसते आहे. (Photo Credit : Girish Katkar Photography)
8 / 9
तर हार्दिकने बेज रंगाचा कुर्ता आणि त्याखाली लाल रंगाचे धोतर नेसले आहे. त्याने गळ्यात रुद्राक्षांच्या माळांचा नेकपीस घातला आहे. तो राजेशाही अंदाजात दिसतो आहे. त्यांच्या या लूकला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.
9 / 9
राणादा आणि पाठकबाई ही जोडी छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरली होती. रिल लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्ये पती पत्नी झाले आहेत.
टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीतुझ्यात जीव रंगला