Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सहकुटुंब सहपरिवार'मधील पश्या लवकरच बांधणार लग्नगाठ, पाहा त्याची खऱ्या आयुष्यातील अंजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 17:15 IST

1 / 9
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेनं आणि त्यातील पात्रांनी कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेतील अंजी आणि पशाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. या मालिकेत पशाची भूमिका अभिनेता आकाश नलावडे याने साकारली आहे. आता आकाश नलावडे याला त्याच्या खऱ्य़ा आयुष्यातील अंजी भेटली आहे.
2 / 9
काही दिवसांपूर्वी आकाशचा साखरपुडा पार पडला होता. आता त्याच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे.
3 / 9
आकाश नलावडे सोशल मीडियावरदेखील खूप सक्रीय असतो. नुकतेच आकाश नलावडेने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या लग्नाची पत्रिका शेअर करत सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. चाहते त्याच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
4 / 9
आकाश नलावडेच्या खऱ्या आयुष्यातील अंजीचं नाव रुचिका धुरी असं आहे. गेल्या वर्षी या दोघांचा साखरपुडा पार पडला होता.
5 / 9
आकाश नलावडेने त्याच्या इन्स्टा स्टोरीला साखरपुड्याचे काही सुंदर फोटो व व्हिडिओ शेअर केले होते.
6 / 9
या दोघांच्या साखरपुड्याच्या शुभप्रसंगी सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील कलाकारांनीही हजेरी लावली होती.
7 / 9
आकाश नलावडेची होणारी बायको रुचिका धुरीसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
8 / 9
रुचिका नेहमीच आकाशसोबत व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. चाहत्यांकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
9 / 9
त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. परंतु पत्रिका समोर आल्याने त्यांचं लग्न लवकरच असणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
टॅग्स :स्टार प्रवाह