वनिता खरातनंतर आता छोट्या पडद्यावरील हा लोकप्रिय अभिनेता बांधणार लग्नगाठ, हळदीचे फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 16:12 IST
1 / 9मराठी टेलिव्हिजनवर सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकानंतर एक कलाकार लग्नगाठ बांधताना दिसत आहे. वनिता खरातने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत नुकतेच लग्नगाठ बांधली. दरम्यान आता 'नवे लक्ष' फेम अभिनेता लवकरच बोहल्यावर चढणार असून त्याच्या हळदीचे रोमँटिक फोटो समोर आले आहेत.2 / 9छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'नवे लक्ष्य' ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. या मालिकेत इन्स्पेक्टर विक्रांत गायकवाडच्या भूमिकेतून अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र घराघरात पोहचला आहे. अभिजीतने नुकतीच चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. तो लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.3 / 9अभिजीतचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला होता. त्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.4 / 9 आता तो लवकरच लग्न करणार आहे. त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव सेजल वारडे आहे.5 / 9अभिजीत आणि सेजल यांच्या हळदीचे रोमँटिक फोटो समोर आले आहेत.6 / 9या रोमँटिक फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली असून ते आता या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.7 / 9अभिजीतची होणारी पत्नी मॉडेल आणि युट्युबर आहे.8 / 9सेजल एक युट्यूबर असून ती एका साडी ब्रॅण्डची मालकीण देखील आहे.9 / 9अभिजीत आणि सेजल यांचा साखरपुडा ११ जून रोजी पार पडला. अभिजीतने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत ही माहिती दिली होती.