लग्नाच्या ५ वर्षानंतर हे प्रसिद्ध कपल होणार आई-बाबा, बेबी बंपसोबत केलेलं फोटोशूट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 14:02 IST
1 / 8द कपिल शर्मा शो आणि 'बिग बॉस 9'मध्ये झळकलेले कपल लवकरच आई-वडील होणार आहेत. कीथ सिक्वेरा आणि रोशेल राव यांनी प्रेग्नेंसी फोटोशूटचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.2 / 8या मॅटर्निटी फोटोशूटमध्ये कीथ आणि रोशेल बीचवर अनेक सुंदर आणि रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.3 / 8रोशेल आणि कीथने मॅचिंग आउटफिट घातले आहेत आणि दोघेही एकत्र छान दिसत आहेत.4 / 8कीथ आणि रोशेलने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि सुंदर कॅप्शन लिहिले. त्यांनी लिहिले की, 'दोन छोटे हात, छोटे पाय, मुलगी असो किंवा मुलगा, आम्हाला लवकरच भेटायचे आहे, हो तुमचा अंदाज बरोबर आहे, आम्ही पालक होणार आहोत.5 / 8कीथ सिक्वेरा आणि रोशेल राव यांनी 2018 मध्ये लग्न केले होते. रिएलिटी शो 'बिग बॉस 9' व्यतिरिक्त ते 'नच बलिए 9' मध्येही एकत्र दिसले आहेत.6 / 8याशिवाय रोशेल खतरों के खिलाडी, इंडियाज लाफ्टर चॅंपियन व्यतिरिक्त द कपिल शर्मामध्येही झळकले आहेत.7 / 8कीथ सिक्वेराने 'देखो मगर प्यार से', 'दीया और बाती हम', 'डोली अरमानों की' यासारख्या मालिकेत काम केले आहे.8 / 8लग्नाच्या 5 वर्षानंतर, रोशेल आणि कीथ त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या या छोट्या पाहुण्यासाठी खूप उत्सुक आहेत.