Join us

Aditi Sharma : ४ महिन्यांत लग्न मोडलं, अभिनेत्रीला रंगेहाथ पकडलं; पतीने केला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:27 IST

1 / 11
टीव्ही अभिनेत्री आदिती शर्माच्या लव्ह लाईफची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ४ महिन्यांपूर्वी तिने गुपचूप लग्न केलं होतं पण आता ती घटस्फोट घेणार आहे.
2 / 11
पती अभिनीत कौशिकने अभिनेत्रीवर फसवणूकीचा गंभीर आरोप केला आहे. त्याने त्याच्या पत्नीला को-स्टार सामर्थ्य गुप्तासोबत पाहिलं होतं.
3 / 11
इंडिया फोरमशी झालेल्या चर्चेदरम्यान अभिनीतने पत्नीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल खुलासा केला. त्याने आदितीला रंगेहाथ कसं पकडलं ते सांगितलं.
4 / 11
अभिनीतला पहिल्यांदा ४ जानेवारी रोजी आदितीवर संशय आला. त्याच्या घरी एक पार्टी होती. तेव्हा त्याला एका व्यक्तीकडे अभिनेत्रीचा कल दिसला.
5 / 11
अभिनीतने आदितीला सामर्थ्यसोबत पाहिलं होतं. आदिती म्हणाली होती की, तिला डिनरला जायचं आहे, ती यासाठी नकार देऊ शकत नाही.
6 / 11
'जेव्हा आदितीने सांगितलं की ती पुन्हा शूटिंगला जात आहे तेव्हा हे सर्व लक्षात आलं. शूटिंग एक्सटेंड होत आहे. मला ही गोष्ट खोटी वाटली.'
7 / 11
'आदितीच्या गाडीत जीपीएस बसवलेला होता. मी तिला ट्रॅक केलं. तिची गाडी एका सोसायटीच्या बेसमेंट उभी होती. मी रात्रभर तिथे आदितीची वाट पाहत होतो.'
8 / 11
'मी सकाळी पाहिलं की आदिती आणि सामर्थ्य रेडी होऊन त्या अपार्टमेंटमधून बाहेर पडत होते. ते कुठेतरी जात होता. मी हे संपूर्ण दृश्य रेकॉर्ड केलं.'
9 / 11
'जेव्हा मी माझ्या पत्नीला विचारलं की तिला सामर्थ्य आवडतो का? तेव्हा आदिती हसली. तिच्या वागण्याने मी गोंधळलो असं अभिनीतने म्हटलं आहे.'
10 / 11
अभिनीत हा प्रोडक्ट डिझायनर आहे. २०२० मध्ये आदितीसोबत त्याचं अफेअर सुरू झालं. एका ऑनलाइन एक्टिंग क्लासमध्ये त्यांची ओळख झाली.
11 / 11
चार वर्षे त्यांचं अफेअर होतं. तो फक्त अदितीला भेटण्यासाठी मुंबईत आला होता. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांनी लग्न केलं.
टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन