Join us

'रामायण'सारख्या मोठ्या सिनेमात वर्णी, तरी करतोय मराठी मालिका; आदिनाथ कोठारे म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:56 IST

1 / 10
मराठीतील हँडसम अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) चक्क पुन्हा मालिकेत दिसणार आहे. २०१६ साली आलेल्या '१०० डेज' या मालिकेनंतर तो आता पुन्हा टीव्हीवर कमबॅक करतोय.
2 / 10
आदिनाथ कोठारे हा महेश कोठारेंचा मुलगा आहे. त्यांचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊसही आहे. कोठारे व्हिजन प्रोडक्शन हाऊस अंतर्गत अनेक मराठी मालिका गाजल्या आहेत.
3 / 10
आता आदिनाथ स्टार प्रवाहवर 'नशीबवान' मालिकेत रुद्र प्रताप घोरपडे ही भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो आला आणि आदिनाथला पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. कोठारे व्हिजनच या मालिकेचे निर्माते आहेत.
4 / 10
आदिनाथ खरंतर रणबीर कपूरच्या 'रामायण' या बहुचर्चित सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तो श्रीरामाचा भाऊ भरत या महत्वाच्या भूमिकेत आहे. अशातच त्याने आता मालिकेत उडी घेतल्याने सर्वांना सुखद धक्काच बसला आहे.
5 / 10
मालिका करण्याबद्दल आदिनाथ म्हणाला, 'मी या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे. ही माझी पहिलीच डेली सोप असणार आहे. बऱ्याच वर्षांपासून माझा मालिकेत काम करण्याचा विचार होताच. नशिबाने 'नशिबवान' मालिकेमुळे तो योग जुळून आला असं म्हणायला हरकत नाही.'
6 / 10
'नशिबवान मालिकेची गोष्ट खूप छान गुंफली आहे. माझी रुद्र प्रताप ही भूमिका आहे ज्याला अनेक पैलू आहेत. हळूहळू ते प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत.'
7 / 10
'टीव्ही माझं आवडतं माध्यम आहे. माझंच नाही तर प्रत्येकाचंच असावं. मालिकेमुळे तुम्ही प्रेक्षकांना दररोज भेटता. कारण तुम्ही घराघरात पोहोचता. प्रेक्षकांच्या कुटुंबाचाच एक भाग होता.'
8 / 10
'आधी सिनेमा, ओटीटीमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण आता त्यांना रोज भेटणं ही भावनाच कमाल आहे. याआधी मी मालिकांची निर्मिती केली त्यामुळे मी पडद्यामागची भूमिका साकारली आहे. आता अभिनेता म्हणून पडद्यावरची भूमिका साकारायला मी उत्सुक आहे.'
9 / 10
'याआधी मी स्टार प्रवाहवरच निर्माता म्हणून कोठारे व्हिजनची पहिली मालिका केली होती. त्यानंतर वाहिनीवर आम्ही अनेक मालिका केल्या ज्या सुपरहिट झाल्या. आता पु्न्हा महाराष्ट्राच्या नंबर वाहिनीसह काम करायला मिळतंय याचा आनंद आहे.'
10 / 10
'मालिकेत अजय पुरकर, सोनाली खरे असे दिग्गज कलाकार आहेत. गणेशोत्सवाच्या धामधुमीत इतकी छान कलाकृती माझ्या वाट्याला आली आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने ही मालिका प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल अशी मला खात्री आहे.'
टॅग्स :आदिनाथ कोठारेटिव्ही कलाकारमराठी अभिनेतास्टार प्रवाह