Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीने ८ वेळा केले IVF प्रयत्न, तिसऱ्या महिन्यात झालेला गर्भपात; आता सरोगसीद्वारे होणार आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:27 IST

1 / 7
भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठने गुडन्यूज दिली आहे. ती सरोगसीद्वारे आई होणार आहे. 'वी आर प्रेग्नंट'म्हणत तिने पतीसोबत फोटी शेअर केला आहे.
2 / 7
संभावना वयाच्या ४४ व्या वर्षी नैसर्गिकरित्या आई होणार होती. मात्र तिसऱ्या महिन्यात तिचा गर्भपात झाला. या दु:खातून सावरणं तिला कठीण गेलं.
3 / 7
तसंच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच गर्भपात झाल्याचा आरोप तिने केला होता. याआधीही संभावना ८ वेळा आयव्हीएफच्या माध्यमातून गरोदर राहण्यासाठी प्रयत्न करत होती.
4 / 7
या संपूर्ण प्रक्रियेत तिला ६५ इंजेक्शन्स घ्यावे लागले. हे सगळं खूप वेदनादायी होतं पण बाळासाठी तिने आनंदाने केलं. जेव्हा तिला वाटलं की इंजेक्शन्स आता बंद होतील तेव्हा बाळाच्या हृदयाचे ठोकेच थांबले.
5 / 7
आता बऱ्याच वर्षांनी कपलला गुडन्यूज मिळाली आहे. संभावनाने फोटो शेअर करत लिहिले, 'वी आर प्रेग्नंट. प्रेम, आशा आणि सरोगसीच्या माध्यमातून आमची सर्वात सुंदर गोष्ट बहरत आहे. काउंटडाऊन सुरु.'
6 / 7
यासोबत त्यांनी चिमुकल्या शूजचे फोटो पोस्ट केले आहेत. पाळीव श्वानाचा आणि बाजूला 'Its official' असं लिहिलेलाही एक फोटो आहे.
7 / 7
संभावना सेठने २०१६ साली अविनाश द्विवेदीशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तब्बल १० वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत.
टॅग्स :सेलिब्रिटीप्रेग्नंसी