'प्रेमाची गोष्ट' मालिकेत तेजश्री प्रधानच्या जागी दिसणार ही अभिनेत्री?, यापूर्वी तिने केलंय या मालिकेत काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:31 IST
1 / 13स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्टमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या काम करताना दिसते आहे. 2 / 13तेजश्री प्रधान हिने मालिकेत मुक्ताची भूमिका साकारली आहे. या मालिकेत तिने साकारलेली मुक्ता प्रेक्षकांना खूप भावली आहे.3 / 13दरम्यान आता अशी माहिती मिळते आहे की, तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट मालिकेतून बाहेर पडली आहे. 4 / 13मालिकेत तेजश्री प्रधानच्या जागी आता कोणती अभिनेत्री पाहायला मिळणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 5 / 13अभिनेत्री स्वरदा ठिगळे प्रेमाची गोष्ट मालिकेत तेजश्रीच्या जागी पाहायला मिळणार असल्याचे समजते आहे. 6 / 13स्वरदा ठिगळे हिंदी आणि मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.7 / 13स्वरदा ठिगळे मुळची पुण्याची असून तिचा जन्म २९ ऑक्टोबर, १९९३ साली झालाय. स्वरदाने तिच्या करिअरची सुरूवात मराठी सिनेविश्वातून केली आहे. 8 / 13२०१३ साली स्वरदाने माझे मन तुझे झाले या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेत तिने शुभ्राची भूमिका केली होती. ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती.9 / 13 तसेच २०१७ साली स्वरदा ठिगळे हिने सावित्री देवी कॉलेज या हिंदी मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिने सांची मिश्राची भूमिका केली होती. 10 / 13स्वरदा स्टार भारत वाहिनीवरील ‘प्यार के पापड’ मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने शिविकाची भूमिका साकारली होती.11 / 13तसेच तिने ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.12 / 13२०२४मध्ये स्वरदाने सिद्धार्थ राऊतसोबत लग्नगाठ बांधली आहे. तेव्हापासून ती इंडस्ट्रीत काम करताना दिसली नाही.13 / 13आता स्वरदा मुक्ताच्या भूमिकेतून प्रेक्षकांना आपलेसे करू शकेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.