Join us
Daily Top 2Weekly Top 5

झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस झाला अन्; आजाराला कंटाळून 'या' अभिनेत्रीने केलेला स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:29 IST

1 / 8
शमा सिकंदर हे नाव टेलिव्हिजन आणि वेबसीरिजच्या दुनियेतील लोकप्रिय असं नाव आहे.
2 / 8
२००३ मध्ये आलेल्या 'ये मेरी लाइफ है' या मालिकेतून शमा सिकंदरला ओळख मिळाली.
3 / 8
परंतु, काही काळ ही अभिनेत्री छोट्या पडद्यापासून दुरावली गेली. यामागे नेमकं काय कारण होतं, याचा खुलासा तिने एका पॉडकास्टमध्ये केलाय.
4 / 8
शमा नैराश्यामुळे दीर्घकाळ ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर राहिली. शमा सिकंदर बाइपोलर डिसऑर्डर या मानसिक आजारने ग्रस्त होती.
5 / 8
याकाळात शमा डिप्रेशनमध्ये गेली होती. इकतंच नाही तर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता.
6 / 8
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्या कठीण काळाविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली, 'मला बाइपोलर डिसऑर्डर नावाचा मानसिक आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होते, माझं वेगळंच जग निर्माण झालं होतं. त्यामुळे मी इतकी नैराश्यात गेले की झोप येण्यासाठी गोळ्या घेऊ लागले.'
7 / 8
पुढे अभिनेत्री म्हणाली,' एके दिवशी गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्याने त्याचा परिणाम माझ्या शरिरावर झाला. मी स्वत संपवण्याचा प्रयत्न करत होते. पण, त्यातून मी बाहेर आले.' असा खुलासा तिने केला.
8 / 8
शमा सिंकदरने 'ये मेरी लाइफ है', 'सेवन' आणि 'बालवीर' या मालिकेत 'भयंकर परी'च्या व्यक्तिरेखेतून ती लोकप्रिय झाली होती.
टॅग्स :शमा सिंकदरटिव्ही कलाकार