बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:49 IST
1 / 9टीव्ही अभिनेत्री खुशी मुखर्जी तिच्या अभिनयापेक्षा बोल्डनेसमुळेच जास्त चर्चेत असते. खुशीचे अनेक बोल्ड व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे तिला अनेकदा ट्रोलही केलं जातं. 2 / 9नुकतीच खुशीने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. 3 / 9फोटोज आणि व्हिडिओज विकून एका अॅपद्वारे कोटी रुपये कमावल्याचा खुलासाही खुशीने केला. 4 / 9'२०२२च्या सप्टेंबर महिन्यात फोटो, व्हिडिओज विकून एका वेबसाईटच्या मदतीने १० कोटी कमावले, हे खरं आहे का?', असा प्रश्न तिला विचारण्यात आला.5 / 9यावर खुशी म्हणाली, 'हो हे खरं आहे. मी माझं स्वत:चं 'खुशी मुखर्जी डॉट कॉम' हे अॅप बनवलं होतं. आताही हे अॅप आहे'. 6 / 9'पण, आता आम्ही कंटेट बदलला आहे. तेव्हा पण असा काही आक्षेपार्ह कंटेट आम्ही टाकत नव्हतो. वेब सीरिजपेक्षा काही वेगळं टाकत नव्हतो'. 7 / 9'खूप चाहते असे होते ज्यांना माझ्याशी बोलायचं असायचं. आजकाल सगळ्या कलाकारांनी स्वत:चं अॅप सुरू केलं आहे'. 8 / 9'फोटोज, व्हिडिओज तिथे पोस्ट केले जायचे. अनेकांनी ते व्हिडिओज अनलॉक केले होते'. 9 / 9'त्यासाठी पैसे द्यावे लागायचे. एका चाहत्याने तो भारतातील नव्हता...त्याने ४-५ वेळाच अॅप उघडून १ कोटी १३ लाख रुपये खर्च केले', असं खुशी मुखर्जी म्हणाली.