By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:43 IST
1 / 7सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आई न होण्याचा निर्णय घेतात. प्रत्येकीची कारणं वेगळी असतात. अशातच एका अभिनेत्रीने आई न होण्याचं वेगळंच कारण सांगितल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.2 / 7ही अभिनेत्री आहे कविता कौशिक. मिसेस चौटाला या भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली ४५ वर्षीय अभिनेत्री कविता कौशिकने आई न होण्यामागचं कारण सांगितलं आहे.3 / 7कविताने २०१७ मध्ये तिचा जुना मित्र आणि बिझनेसमन रोनित बिस्वास याच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत, परंतु या जोडप्याला मुलं नाहीत.4 / 7कविताने एका मुलाखतीत स्पष्ट केले होते की, तिने आणि तिच्या पतीने मिळून कधीही आई-वडील न होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागचे कारण सांगताना कविता म्हणाली होती, 'जर मी वयाच्या ४० व्या वर्षी आई झाली, तर माझं मूल २० वर्षांचे होईपर्यंत आम्ही म्हातारे होऊ.''5 / 7''माझ्या मुलाने त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजेच वयाच्या २० व्या वर्षी आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांची जबाबदारी उचलून स्वतःचं आयुष्य जगणं सोडून द्यावं, असं आम्हाला वाटत नाही. आम्हाला आमच्या मुलावर हे ओझं टाकायचं नाही.', असं कविता म्हणाली.6 / 7''कधीकधी रोनित माझ्यासाठी वडिलांसारखा वागतो, तर कधी मी त्याच्यासाठी आईसारखी काळजी घेते. आम्ही दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी आहोत आणि आम्हाला फिरण्याची खूप आवड आहे.'', असंही कविता म्हणाली.7 / 7कविता कौशिक आज ४५ व्या वर्षात पदार्पण करत असली तरी तिचा फिटनेस आणि तिची एनर्जी आजही नवीन अभिनेत्रींना टक्कर देणारी आहे. आई न होण्यामागचं कविताचं कारण ऐकून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत तर काहींनी तिच्या निर्णयाचं स्वागत केलंय.