गेल्या २२ वर्षांपासून या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत अभिनेता राहतोय लिव्ह इनमध्ये, लग्नाबद्दल म्हणाला - "आता मरण आलं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 10:54 IST
1 / 8सिनेइंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी पहिलं लग्न मोडल्यानंतर दुसऱ्यांदा संसार थाटला आहे. तर काहींनी लग्न करताच लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा निर्णय घेतलाय. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी तब्बल २२ वर्षे बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहते आहे.2 / 8गेली २२ वर्ष लिव्ह इनमध्ये राहणारं कपल म्हणजे संदीप बसवाना आणि अभिनेत्री अश्लेषा सावंत. अश्लेषाला अनुपमा मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. ती गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.3 / 8अभिनेता संदीप बसवाना याने अलिकडेच अश्लेषासोबतच्या नात्यावर भाष्य केले होते. तो म्हणाला होता की,'मी वर्तमानात जगतो. मी आता लग्न करत नाही आहे. लग्न करेन किंवा नाही. पण मी माझ्या पार्टनरसोबत असतो. भविष्यात उद्या माझं लग्नदेखील होईल.'4 / 8पुढे तो म्हणाला की, 'आपल्याकडे पेपरवर्कला खूप महत्त्व आहे. त्यामुळे कदाचित मी त्या कारणामुळे लग्नही करेन. पण ही माझी बायको आहे, हे सांगण्यासाठी मी हे करणार नाही.'5 / 8संदीप म्हणाला की, 'अध्यात्माकडे मी जात असेन आणि तिथे ती माझ्यासोबत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. बरेच लोक मला विचारतात की तू मुंबईत का आला? मी स्पष्ट सांगतो की मी मजा करायला आलो होतो. मला पार्टी करायची होती. सुंदर मुलींच्या आजूबाजूला वावरायचं होतं.'6 / 8पुढे तो म्हणतो की, 'मला जगायचं होतं जे मला हरियाणात शक्य नव्हतं. मला इथे मजा आली. त्यानंतर त्याचा कंटाळाही आला आणि नंतर अध्यात्म माझ्या आयुष्यात आले. आता मी माझ्या आयुष्यात पळवाट शोधत नाही.'7 / 8कमल मालिकेच्या सेटवर अश्लेषा आणि संदीप बसवाना यांची भेट झाली. त्यावेळी ती १८ आणि तो २४ वर्षांचा होता. अभिनेता सांगतो की, मला आज हे करायचं आहे उद्या ते, आम्हाला मुलं हवी आहेत असं आमचं काही नव्हतं. तुला जे हवं ते तू कर मी तुझ्याबरोबर आहे. मला फक्त तुझी साथ हवी आहे असं ती नेहमी म्हणायची.8 / 8अश्लेषा आणि संदीप गेल्या २२ वर्षांपासून एकत्र आहेत. तो सांगतो की, 'आम्ही आमच्या आयुष्यातील सगळी कामं एकत्र केली आहेत. आधी अश्लेषाला ध्यानात रस नव्हता. २०१४-१५ मध्ये तिला पहिल्यांदा ओशो आश्रमात घेऊन गेलो आणि तिला ते खूप आवडलं. आता ती म्हणते मला मरण आलं तरी फरक पडत नाही. फक्त सोबत प्रेम असायला हवं.'