Join us
Daily Top 2Weekly Top 5

हर हर महादेव! मराठी अभिनेत्याची तुंगनाथ यात्रा; फोटो शेअर करत म्हणाला "कोणताही प्लॅन नाही, फक्त बॅग भरली अन् निघालो..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 10:50 IST

1 / 10
तुंगनाथ (Tungnath) हे उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात स्थित जगातील सर्वात उंच शिव मंदिर आहे, जे ३,६८० मीटर उंचीवर आहे. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे, जे दगडी स्वरूपात आहे.
2 / 10
पंच केदारांपैकी एक असलेले हे मंदिर पांडवांनी स्थापन केल्याचे मानले जाते. चोपटा येथून सुरू होणारा ३.५ किमीचा ट्रेक करून येथे पोहोचता येते, जो ट्रेकर्ससाठी लोकप्रिय आहे.
3 / 10
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अभिजित आमकरने नुकतीच तुंगनाथ यात्रा पूर्ण केली.
4 / 10
तुंगनाथ मंदिरात दर्शन घेतल्यावर अभिजित आमकरने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत.
5 / 10
अभिजित आमकरनं कोणत्याही प्लॅनशिवाय अचानक बॅग भरून थेट तुंगनाथ गाठल्याचं सांगितलं.
6 / 10
अभिजितने तुंगनाथ ट्रेकचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर करताना लिहलं, 'ऐनवेळी ठरलेला बेत. कोणताही नियोजित कार्यक्रम नाही, कसलाही अतिविचार नाही... फक्त बॅग भरली आणि घरातून निघालो. कशाचा तरी असा भास झाला, की जणू 'त्यानेच' मला स्वतःकडे बोलावले आहे'
7 / 10
पुढे त्यानं लिहलं, 'गेला महिना भावनिक, शारीरिक आणि मानसिक अशा सर्वच पातळ्यांवर अत्यंत चढ-उतारांचा ठरला... आणि कदाचित मला इतर कशापेक्षाही 'शांततेची'च अधिक गरज होती. हातात २-३ दिवस होते, कोणतीही योजना नव्हती; आणि आता मी इथे आहे... तुंगनाथाच्या ट्रेकला निघालो आहे'.
8 / 10
अभिजितने यापूर्वी २०१९ मध्ये शेवटचा ट्रेक केला होता. तो म्हणाला, 'मी शेवटचा ट्रेक केला होता, त्याला आता ब पुष्कळ वर्षे लोटली आहेत... कदाचित २०१९ मध्ये. काळाच्या ओघाने मी अधिक शांत झालो आहे की अधिक समंजस, हे मला ठाऊक नाही... पण या उंच पर्वतराजीतल्या एखाद्या गोष्टीने माझ्या आत्म्याला नक्कीच स्पर्श केला आहे'.
9 / 10
शेवटी त्यानं लिहलं, 'पर्वतरांगा, ती थंडगार हवा, ते मंत्रोच्चार, ती शांतता... सर्व काही अगदी वेगळे भासत होते. कधीकधी तुम्हाला उत्तरांची गरज नसते; तुम्हाला फक्त त्या कोलाहलापासून, गोंधळापासून थोड्या अंतराची गरज असते. हर हर महादेव', या शब्दांत त्यानं आपला अनुभव मांडला.
10 / 10
अभिजितने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी, 'हर हर महादेव' म्हणत कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
टॅग्स :मराठी अभिनेताउत्तराखंडटिव्ही कलाकार