Join us

‘आई माझी काळूबाई’मधील मालती म्हणजेच जान्हवी किल्लेकरचे फोटो, खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 17:14 IST

1 / 10
‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील मालती आठवते ना? नकारात्मक भूमिकेत असली तरी तिचा सहज सुंदर अभिनय आणि घारे डोळे चाहत्यांना भुरळ पाडल्यावाचून राहत नाहीत. मालतीची ही ठसकेबाज भूमिका साकारलीये अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने.
2 / 10
‘आई माझी काळूबाई’ ही मालती अर्थात जान्हवी किल्लेकर खऱ्या आयुष्यात एकदम ग्लॅमरस आहे.
3 / 10
सोशल मीडियावर जान्हवी प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे रोज नवे फोटो ती शेअर करत असते.
4 / 10
अभिनयासोबतच तिला नृत्याची देखील खूप आवड आहे. जान्हवी उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून लोकप्रिय आहे.
5 / 10
जान्हवीला नृत्याची प्रचंड आवड आहे. अनेक कोळी गीतांमधून तिने नृत्य सादर केले आहे. ‘गोल्डीची हळद’ या गाण्यात ती भाऊ कदम यांच्या सोबत थिरकताना दिसली होती.
6 / 10
वाजले बारा, कोळीवाडा झिंगला हे तिचे म्युझिक व्हिडिओ खूप लोकप्रिय झालेत.
7 / 10
‘आई माझी काळूबाई’ या मालिकेआधी जान्हवी किल्लेकर ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिने श्री लक्ष्मी देवीची व्यक्तिरेखा साकारली होती.
8 / 10
जान्हवीला नृत्यासोबतच खाण्याची प्रचंड आवड आहे. म्हणजेच ती अगदी फूडी आहे.
9 / 10
तिला वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला आवडतात.अर्थात फुडी असली तरीही तिने स्वत:च्या फिटनेस कडे दुर्लक्ष केलेले नाही.
10 / 10
‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील नायिका म्हणजे वीणा जगताप आणि जान्हवी या मालिकेत एकमेकांच्या विरुद्ध आहेत. पण खऱ्या आयुष्यात त्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.
टॅग्स :अलका कुबलटेलिव्हिजन