1 / 7'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाची भूमिका साकारून दिपाली पानसरेने लोकप्रियता मिळवली. 2 / 7दिपालीने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने कास्टिंग काऊचचा प्रसंग शेअर केला. 3 / 7दिपाली म्हणाली, 'पहिले १२ दिवस सेटवर मी कोणाशीच बोलत नाही. कारण या १२ दिवसांत मला लोक ओळखायचे असतात'. 4 / 7'हा नियम मी स्वत:ला घालून घेतला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मी कधी अप्रोचेबल वाटले नाही'. 5 / 7'एकदा फक्त एका सिनेमासाठी दिग्दर्शकाने मला महिला मेकअप आर्टिस्टकडून क्रॉम्प्रोमाइजची विचारणा केली होती. तेव्हा मी त्याला खूप शिव्या दिल्या होत्या'.6 / 7'पण, यानंतर कोणीही मला असं काही बोललेलं नाही. रोल दिला तर कॉम्प्रोमाइज करणार का? असं त्याने विचारलं होतं'. 7 / 7'मी तेव्हा नवीन होते. त्यामुळे हा शब्दच माहीत नव्हता. त्यानंतर मी त्या मेकअप आर्टिस्टला आणि दिग्दर्शकालाही खूप बोलले. मी पहिल्यापासूनच खूप बिनधास्त आहे. मी घाबरत नाही. इंडस्ट्रीत लोक खूप फेक वागतात'.