1 / 10छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या पात्रांमधील जेठालाल आणि दयाबेन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.2 / 10जेठालालचे खरे नाव दिलीप जोशी असून ते टेलिव्हिजन आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. मात्र त्यांना खरी ओळख तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतून मिळाली. 3 / 10‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांचा आज वाढदिवस आहे. 4 / 10आज आपण जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.5 / 10 दिलीप जोशीची पत्नी लाइमलाइटपासून नेहमी दूर राहते. त्याच्या पत्नीचे नाव जयमाला जोशी आहे. 6 / 10दिलीप जोशी आणि त्यांची पत्नी यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. 7 / 10दिलीप जोशी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता असूनही त्याची पत्नी लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.8 / 10दिलीप जोशी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे नाव नियती तर मुलाचे नाव रित्विक आहे.9 / 10 दिलीप जोशी पूर्णपणे फॅमिली मॅन आहेत. 10 / 10सोशल मीडियावर दिलीप आपल्या पत्नी आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतात.