प्रभाससोबत अफेयर्सच्या चर्चा, घटस्फोटीत दिग्दर्शकासोबत जोडलं गेलं नाव, अशी आहे 'बाहुबली'तल्या 'देवसेने'ची लव्हलाइफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 11:19 IST
1 / 10अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) ७ नोव्हेंबरला तिचा वाढदिवस साजरा करत आहे.2 / 10'बाहुबली' फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोराववर सिनेइंडस्ट्रीत आपली ओळख बनवली आहे. तिने अनेक दमदार सिनेमात काम केले आहे. मात्र बाहुबली हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास आहे.3 / 10 बाहुबली चित्रपटात अनुष्का शेट्टीने देवसेनाची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात ती प्रभाससोबत झळकली होती.4 / 10अनुष्काचे प्रभाससोबत अफेयरच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, अनुष्का आणि प्रभास रिलेशनशीपमध्ये होते. प्रभास अनुष्कावर खूप इंप्रेस होता. मात्र ते त्यांच्या नात्याला मैत्रीचं नाव देत राहिले.5 / 10प्रभासने अनुष्का सोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेला उत्तर देताना म्हटलं होतं की, जेव्हा दोन लोक सातत्याने एकत्र काम करतात तेव्हा त्यांच्या अशा अफवा पसरू लागतात. मी तिला कसं डेट करू शकतो? 6 / 10अनुष्काने देखील म्हटले होते की, तिने प्रभासला डेट करत नव्हते. याशिवाय तिचे नाव एका घटस्फोटीत दिग्दर्शकासोबत जोडले गेले होते.7 / 10अनुष्काचे नाव घटस्फोटित दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुडीसोबतही जोडले गेले होते. दोघेही लग्न करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. 8 / 10 याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली होती की, अशा बातम्या कोणी कसे लिहू शकतो? जे लोक अशा बातम्या लिहितात त्यांना वाटते की याचा परिणाम अभिनेत्रीच्या कुटुंबावर होत नाही. 9 / 10जेव्हा सामान्य लोक त्यांचे नाते लपवू शकत नाहीत, तेव्हा सेलिब्रिटी ते कसे लपवतील? मी माझ्याशी संबंधित गोष्टी लपवत नाही, असे तिने म्हटले होते.10 / 10 अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तिच्याकडे घाटी आणि कठानार – द वाइल्ड सॉर्सर सारखे चित्रपट आहेत. दोन्ही चित्रपटांची शूटिंग सुरू आहे. शेवटची ती मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी या चित्रपटात दिसली होती.