PHOTOS : क्या से क्या हो गई... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ‘सोनू’चा नवा लुक पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 17:38 IST
1 / 9‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत अनेक कलाकार आलेत आणि गेलेत, पण चाहते त्यांना अद्यापही विसरलेले नाहीत. मालिकेतील अनेक बालकलाकार लहानाचे मोठे झालेले चाहत्यांनी पाहिलेत. निधी भानुशाली त्यापैकीच एक. पण आत्ता तुम्ही तिला पाहाल तर ओळखू शकणार नाही.2 / 9होय,‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील जुनी सोनू अर्थात निधी भानुशाली सध्या मालिकेत काम करत नाही. पण सोशल मीडियावरच्या फोटोंमुळे जाम चर्चेत असते. भिडे मास्तरांच्या या साध्याभोळ्या लेकीचे ताजे फोटो पाहाल तर थक्क व्हाल.3 / 9सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी निधी भानुशाली आपले वेगवेगळे फोटो नेहमी शेअर करत असते. तिच्या बोल्ड लूकचीही चर्चा चाहत्यांमध्ये सुरु असते. मात्र, आता निधीने एकदम हटके मेकओव्हर केला आहे.4 / 9निधीने दिवाळी सेलिब्रेशनचे काही नवे फोटो शेअर केले आहेत. यात निधीला ओळखणंही कठीण झालं आहे. फोटोत तिचे कुटुंबीय दिसत आहेत.5 / 9यात हेअरकटमुळे निधी एकदम वेगळी दिसतेय. तिचा बदललेला लुक पाहून चाहतेही थक्क आहेत. काहींना तिचा हा लुक आवडला आहे तर काहींनी पाहून नापसंती दर्शवली आहे. क्या से क्या हो गई देखते देखते, अशी कमेंट एका युजरने केली आहे.6 / 9निधीचा हा टॉमबॉय लूक तिच्या काही चाहत्यांना आवडला आहे. तर काही चाहते मात्र तिच्यावर टीका करत आहे. आधी किती क्यूट दिसायची आणि आता हा घाणेरडा हेअरकट केला आहे, असं एका युजरने लिहिलं आहे.7 / 9सर्वप्रथम सोनूची भूमिका झील मेहताने साकारली होती. 9 वर्षांच्या वयापासूनच झीलने या मालिकेत काम करणे सुरु केले होते. पण तिनेही अभ्यासासाठी ही मालिका सोडली होती. तिच्या नंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये निधी भानूशालीची एन्ट्री झाली होती.8 / 9निधी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. इन्स्टावर तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत.9 / 9‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून निधी केव्हाच बाहेर पडली असली, तरी तिच्या चाहत्यांची संख्या मात्र कधीच कमी झाली नाही.