TMKOC: 'तारक मेहता'मधील भिडे मास्तरांचं मानधन किती आहे माहितीये का?, आकडा पाहून येईल तुम्हाला भोवळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 11:52 IST
1 / 8'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत आत्माराम भिडेची भूमिका मंदार चंदावरकर(Mandar Chandavarkar)ने साकारली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतले भिडे मास्तर खूप लोकप्रिय आहेत. (फोटो इन्स्टाग्राम) 2 / 8मंदार चांदवाडकर गेले अनेक वर्ष ही भूमिका साकारत आहेत. आत्माराम भिडे हे नाव इतकं लोकप्रिय झालंय की त्यांचं खरं नावही शेजाऱ्यांना माहीत नाही. (फोटो इन्स्टाग्राम) 3 / 8अभिनेता मंदार चांदवडकर आधी दुबईमध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करत होते. २००० मध्ये त्याने नोकरीला रामराम केला. (फोटो इन्स्टाग्राम) 4 / 8 त्यानंतर नाटक आणि मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आठ वर्ष मराठी नाटकांमध्ये काम केल्यानंतर आत्माराम भिडे ही व्यक्तिरेखा साकारायला सुरुवात केली. (फोटो इन्स्टाग्राम) 5 / 8भिडे हे पात्र घराघरात पोहचलं की मंदार यांचे शेजारीही त्यांना खऱ्या नावाने ओळखत नाहीत. त्यांचे शेजारी देखील त्याला भिडे नावानेच हाक मारतात. (फोटो इन्स्टाग्राम) 6 / 8'तारक मेहता'मधील भूमिकेसाठी मंदार आज एका एपिसोडसाठी मोठी रक्कम घेतो. रिपोर्ट्सनुसार त्याला पोपटलाल (श्याम पाठक) पेक्षा जास्त मानधन मिळतं. पोपटलाल प्रत्येक एपिसोड 60 हजार रुपये आहे, तर मंदार 80 हजार रुपये आकारतो. (फोटो इन्स्टाग्राम) 7 / 8'आत्माराम भिडे' उर्फ मंदार चांदवडकर याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. 'प्राइम्स वर्ल्ड'च्या रिपोर्टनुसार मंदारची एकूण संपत्ती 42 कोटी रुपये आहे. त्याला महागड्या गाड्यांची आवड आहे. (फोटो इन्स्टाग्राम) 8 / 8मंदार चांदवडकरच्या रिअल लाइफ फॅमिलीबद्दल सांगायचे तर त्याच्या रिअल लाइफ पत्नीचे नाव स्नेहल आहे. त्यांना एक मुलगाही आहे, त्याचे नाव पार्थ आहे. (फोटो इन्स्टाग्राम)