Join us
Daily Top 2Weekly Top 5

कधी कधी कठोर निर्णय घ्यावेच लागतात...; सुश्मिताने सांगितलं रोहमनसोबतच्या ब्रेकअपचं कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 13:17 IST

1 / 7
सुश्मिता सेनचं नुकतंच ब्रेकअप झालं. सुश्मिताने स्वत: तिच्या व रोहमन शॉलच्या ब्रेकअपची बातमी कन्फर्म केली होती.
2 / 7
ब्रेकअप खूप आधीच झालं होतं. पण प्रेम अद्यापही कायम आहे, अशी पोस्ट सुश्मिताने शेअर केली होती. अर्थात अचानक ब्रेकअप का झालं हे कळायला मार्ग नव्हता.
3 / 7
पण कदाचित सुश्मिताने अप्रत्यक्षपणे त्यामागचं कारणही सांगितलं आहे. होय, काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, अशा आशयाची सूचक पोस्ट तिने शेअर केली आहे.
4 / 7
जिवंत राहण्यासाठी जोखिम पत्करावीच लागते. आनंदी राहण्यासाठी कधी कधी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात आणि त्यासाठी खूप हिंमत लागते. मात्र ते कधी घ्यायचे याचाही निर्णय घ्यावा लागतो. अशा आशयाची तिची पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.
5 / 7
तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही सर्व हे करू शकता. तुम्हाला कोणीही गृहित धरू शकत नाही,असेही सुश्मितानं त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यावर अनेक चाहत्यांनी सुशला सपोर्ट केला आहे.
6 / 7
कोणी काही का म्हणेना मात्र मी तुमच्यासोबत आहे. अशा शब्दांत एका चाहतीने सुश्मिताच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे.
7 / 7
2018 साली शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत सुश्मिता व रोहमन यांनी हातात हात घालून पोज दिल्या होत्या. यानंतर काही महिन्यांनी दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती.
टॅग्स :सुश्मिता सेनरोमहन शॉल