Rhea Chakraborty : "...म्हणूनच मी सुशांतला त्यादिवशी ब्लॉक केलं"; रिया चक्रवर्तीने सांगितलं नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:21 IST
1 / 11रिया चक्रवर्तीने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या मेसेजबद्दल सांगितलं आहे. ९ तारखेला त्याने मला मेसेज केला होता आणि तू कशी आहेस असं विचारल्याचं तिने सांगितलं. 2 / 11'सुशांतला माहित होतं की माझी तब्येत ठीक नाही. मात्र ८ ला मी दुपारी घरी आली होती आणि ९ ला दुपारपर्यंत त्याने एकही फोन किंवा मेसेज केला नाही.' 3 / 11'९ ला त्याने How are yoy my bebu? असा मेसेज केला होता. पण त्यावेळी मी खूपच दु:खी होती.' 4 / 11'मी दुखावली गेली होती कारण त्याने मला एकही फोन केला नाही. फक्त एक मेसेज केला. मी खूप चिंतेत आहे, आजारी आहे हे त्याला माहित होतं.' 5 / 11'मी माझ्या एका जुन्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की, मी त्याला ९ तारखेला ब्लॉक केलं कारण मला असं वाटलं की त्याला मी त्याच्या आयुष्यात नको आहे.' 6 / 11'सुशांत आणि त्याच्या बहिणींच्यामध्ये मला यायचं नव्हतं. मी त्यात पडायचं नव्हतं.' 7 / 11'सुशांतच्या कुटुंबीयांना याबाबत काहीच माहिती नाही. पण तो त्याच्या कुटुंबाच्या खूप जास्त जवळ होता' असं रियाने म्हटलं आहे. 8 / 11१४ जून २०२० रोजी सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर रियावर खूप टीकाही केली गेली. 9 / 11रियावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. ती जेलमध्येही होती. पण आता ती या परिस्थितीतून हळहळू बाहेर पडत आहे. 10 / 11अभिनेत्रीने आता आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली आहे. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. 11 / 11