काव्या मारनच्या रुमर्ड बॉयफ्रेंडने १ हजार कोटींच्या चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतली, कोण आहे 'तो'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:11 IST
1 / 10आयपीएलमधील संघ मालकांपैकी काव्या मारन (Kavya Maran) हे सर्वात चर्चेतलं नाव आहे. काव्या मारन एक प्रभावी आणि प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. मारन हिचं कुटुंब उद्योग जगतातील मोठं नाव आहे. 2 / 10सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) संघाची मालकीण काव्या ही क्रिकेटमुळं तर कायम चर्चेत असतेच. पण, आता ती तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडमुळं चर्चेत आली आहे. 3 / 10मीडिया रिपोर्टनुसार काव्या मारन ही प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर (Anirudh Ravichander) याला डेट करत आहे. मात्र दोघांनाही अजून त्यांचं नातं सार्वजनिक केलेलं नाहीये. चेन्नईतील एका हायप्रोफाईल ठिकाणी दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. पण, त्यांच्या टीमनं अफेअरच्या चर्चांना नाकारलं आहे. 4 / 10अनिरुद्ध रविचंद हा प्रसिद्ध अभिनेते रवी राघवेंद्र यांचा मुलगा आहे. अनिरुद्धने दक्षिण चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचं नाव कमावलं आहे. 5 / 10१६ ऑक्टोबर १९९० रोजी जन्मलेला अनिरुद्ध हा 'Why This Kolaveri Di' या गाण्याने अनिरुद्ध जगभरात प्रसिद्ध झाला होता. 6 / 10तो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा संगीतकार आहेत. एका चित्रपटासाठी तो कोटींचं मानधन घेतो. मानधनाच्या बाबतीत त्यानं मोठ्या संगीत दिग्दर्शकांना मागं टाकलं आहे. 7 / 10 ए.आर. रहमान (A. R. Rahman) आणि प्रीतम सारखे महान संगीतकारही अनिरुद्ध याच्यापेक्षा मागे पडले आहेत. रिपोर्टनुसार, ए.आर. रहमान हे ७ ते ८ कोटी रुपये घेतात. तर प्रीतम ५ कोटी रुपयांपर्यंत मानधन घेतो. 8 / 10हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटात संगीत देण्यासाठी अनिरुद्ध रविचंद यांनी १० कोटी रुपये घेतले होते.9 / 10शाहरुखच्या आधी अनिरुद्ध रविचंद यांनी कमल हासन, रजनीकांत आणि थलापती विजय सारख्या मोठ्या दिग्गजासोबत काम केलं आहे. 10 / 10विशेष म्हणजे ज्या अनिरुद्ध रविचंदर याच्या प्रेमात काव्या पडली आहे, तो चेन्नई सुपरकिंग्सचा चाहता आहे. एवढंच नाही चेन्नई सुपरकिंग्सचं टीम अँथम सुद्धा अनिरुद्ध रविचंदर यानेच लिहिलंय.