Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sudha murty: सुधा मूर्तींनी एकाच वर्षात पाहिले ३६५ चित्रपट; सांगितले सर्वात प्रभावी २ अभिनेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 15:54 IST

1 / 10
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या सध्या भारतात असून वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. या कार्यक्रमात त्यांनी पुण्यातील कॉलेज लाईफबद्दल सांगितलं.
2 / 10
लंडनचे पंतप्रधान ऋषि सुनक हे सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. सुधा मूर्ती नुकतेच कपिल शर्मा शो मध्ये आल्या होत्या. तेव्हा त्यांनी अनेक किस्से सांगितले. याच कार्यक्रमात त्यांनी कॉलेज जीवनातील काही गोष्टीही सांगितल्या.
3 / 10
याच कार्यक्रमात सुधा मूर्तींनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेताना आलेले अनुभव शेअर केले. इंजिनिअरींग हा केवळ मुलांसाठीचा कोर्स आहे, त्यात मुलींना यायचं नाही, असाच समज त्याकाळी होता.
4 / 10
सुधा यांनी इंजिनिअरींग करण्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर २-३ महिन्यात ही मुलगी जाईल, असे अनेकांना वाटायचे. कारण, त्या इंजिनिअरींगसाठी त्या एकमेवच मुलगी होत्या.
5 / 10
कार्यक्रमात त्यांनी नारायण मूर्तींची पहिली भेट कशी झाली, भेटल्या त्यांना काय वाटलं याबद्दलही माहिती दिली. तसेच, कॉलेज जीवनातील मजामस्ती आणि चित्रपटांबद्दलही सांगितलं.
6 / 10
मी खूप चित्रपट पाहिले आहेत. मला आठवतं, जेव्हा मी पुण्यात होते तेव्हा कोणीतरी माझ्याशी रोज चित्रपट बघण्याची पैज लावली होती. त्या वेळी मी ३६५ दिवस रोज एक चित्रपट पाहिला.
7 / 10
तर, तरुणपणातील आठवण सांगताना म्हटले, “मी तरुण होते तेव्हा दिलीप कुमार माझे आवडते अभिनेते होते. ते अत्यंत भाव ओतून प्रत्येक भूमिका साकाराचे, तसं इतर कोणीही केलं नाही. तसं काम फक्त शाहरुख खानच करू शकतो.
8 / 10
शाहरुख खानचा ‘वीर जारा’ हा चित्रपट पाहिल्यावर मी माझ्या मुलीला सांगितलं होतं, जर दिलीप कुमार आज तरुण असते तर तेच या चित्रपटात असते.
9 / 10
आता शाहरुख खानने त्यांची जागा घेतली आहे आणि फक्त तोच तसं काम करू शकतो. आता त्यांची ‘द कपिल शर्मा शो’मधील ही मुलाखत खूप चर्चेत आली आहे.
10 / 10
दरम्यान, या चित्रपटात त्यांनी जावई ऋषी सुनक हे लंडनचे पंतप्रधान झाल्यानंतरच्या आलेल्या काही अनुभवांवरही भाष्य केलं
टॅग्स :सुधा मूर्तीइन्फोसिसकपिल शर्मा