By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:16 IST
1 / 11एका लोकप्रिय मालिकेतील एका अभिनेत्रीचा 'आजीबाई'च्या लूकमधील फोटो समोर आला आहे.2 / 11 या फोटोंमध्ये अभिनेत्रीने पांढरे केस, साधं लुगडं नेसून आजीबाईंचा सारखा लूक केलाय. या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं का? 3 / 11ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नाही तर अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarada Thigale)आहे. 4 / 11स्वरदा ठिगळे ही 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht) मालिकेत मुक्ताच्या भुमिकेत आहे. आधी तेजश्री प्रधान मुक्ताच्या भूमिकेत होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच तेजश्रीने मालिकेतून एक्झिट घेतली. तिच्या जागी मालिकेत स्वरदा ठिगळे मुक्ताची भूमिका साकारतेय. 5 / 11 मालिकेत स्वरदा ठिगळे अर्थात मुक्ता एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेतील हा नवा अवतार मुक्ता धारण करणार आहे लाडक्या सईसाठी. 6 / 11सईवर मुक्ताचं जीवापाड प्रेम आहे. सईशिवाय ती एक क्षणही राहू शकत नाही. मात्र, चिमुकली सई मुक्ताईवर रुसली आहे. मुक्ताईचं पूर्वीसारखं आपल्यावर प्रेमच नाही असा गैरसमज तिने करुन घेतला आहे. म्हणूनच तर रागावलेली सई सध्या मुक्तापासून दूर सावनीच्या घरी राहतेय. सईचा रुसवा घालवण्यासाठी मुक्ताने एक नवी युक्ती शोधून काढली आहे.7 / 11 वृद्ध गोदा मावशीचा वेश धारण करुन ती सावनीच्या घरी सईला भेटण्यासाठी जाणार आहे. आपल्या मुलांच्या प्रेमाखातर एक आई काय काय करु शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुक्ताई. मुक्ताचं हे नवं रुप सावनीला सळो की पळो करुन सोडणार हे मात्र नक्की. मुक्ताचं हे रुप आजवर मालिकेत कधीही पाहायला मिळालं नाही. 8 / 11'प्रेमाची गोष्ट'मध्ये साध्या सरळ मुक्ताच्या भुमिकेत असलेली स्वरदा ही खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आहे.9 / 11स्वरदा तिच्या चाहत्यांची अतिशय फेव्हरेट आहे. ती आपल्या चाहत्यांसाठी अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.10 / 11स्वरदाला फोटोशूट करण्याची, फिरण्याची आणि योगा करण्याची फार आवड आहे, हे तिच्या फोटोवरून दिसते. स्वरदा ही फक्त अभिनेत्रीच नाही तर एक सुंदर नृत्यांगनासुद्धा आहे.11 / 11'प्रेमाची गोष्ट' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. तेव्हा पाहायला विसरु नकी प्रेमाची गोष्ट नव्या वेळेत म्हणजेच सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.