Join us

२५ वर्ष चाळीत घालवली, १०० वेळा झाली रिजेक्ट, 'मुन्नाभाई MBBS' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगलिंग काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:04 IST

1 / 10
अनेक असे कलाकार आहेत जे स्टार बनण्याआधी मुंबईतल्या चाळीत राहत होते. बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणजेच जॅकी श्रॉफ यांनीदेखील ३७ वर्षे चाळीत व्यतित केले आहेत. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री आहे, जिने २५ वर्षे चाळीत व्यतित केली आहेत.
2 / 10
प्रिया बापटने मराठीसोबत हिंदी सिनेइंडस्ट्रीत काम केले आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
3 / 10
प्रिया बापटने डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुरस्कार विजेत्या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात तिने मामूटीसोबत बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
4 / 10
२००३ मध्ये प्रियाने संजय दत्त-राजकुमार हिराणी यांच्या मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातून अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात प्रियाने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. त्याचवेळी 'लगे रहो मुन्ना भाई'मध्येही तिची खास भूमिका होती.
5 / 10
प्रिया बापट मुंबईतील दादर येथील रानडे रोडवरील एका छोट्या चाळीत लहानाची मोठी झाली आहे. २०१८ मध्ये टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना तिने चाळीत घालवलेले कठीण दिवसांबद्दल सांगितले होते.
6 / 10
प्रिया म्हणाली होती की, मी माझ्या आयुष्यातील २५ वर्षे चाळीत घालवली. लग्न होईपर्यंत मी तिथेच राहिले. दिवाळीपासून ते प्रत्येक सण साजरे करण्यापर्यंत माझ्या अनेक आठवणी त्या चाळीशी जोडलेल्या आहेत.
7 / 10
विशेष म्हणजे त्या चाळींमधील सर्व घरे एकमेकांना जोडलेली होती. सर्व घरे आतून दरवाजांनी जोडलेली होती, त्यामुळे तुम्ही बाहेर न जाता संपूर्ण चाळीत फिरू शकता. या व्यवस्थेमुळे सर्व कुटुंबे एकमेकांशी जोडली गेली. आता असे दिसते की अपार्टमेंट सिस्टमने लोकांमध्ये अंतर निर्माण केले आहे, असे प्रिया म्हणाली.
8 / 10
उमेश कामतसोबत लग्न होईपर्यंत प्रिया बापट याच चाळीत राहिली होती. याआधी तिने चित्रपटांमध्ये पदार्पण केले असूनही ती चाळमध्येच राहिली.
9 / 10
प्रिया बापटचा सिनेइंडस्ट्रीतला प्रवास सोप्पा नव्हता. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, पहिल्यांदा टेलिव्हिजनवरील जाहिरात मिळायला तिला १०० वेळा रिजेक्ट केले गेले होते.
10 / 10
प्रिया बापट शेवटची रात जवान है या सीरिजमध्ये पाहायला मिळाली.
टॅग्स :प्रिया बापट