राज निदिमोरुची एकूण नेटवर्थ किती?; समंथापेक्षा इतक्या वर्षांनी मोठा आहे दुसरा नवरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 16:01 IST
1 / 10अभिनेत्री समंथा रुथ प्रभू दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. कोईम्बतूर येथील सद्गुरुंच्या ईशा योग सेंटरच्या लिंग भेरवी मंदिरात तिने दिग्दर्शक राज निदिमोरुसोबत सातफेरे घेतले. 2 / 10समंथाने लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. लाल रंगाची साडी, भरजरी दागिने, हातावर मेहंदी, केसात गजरा या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.3 / 10राज निदिमोरुने गाजलेल्या 'फॅमिली मॅन' सीरिजचे दिग्दर्शन केलं आहे. तसंच 'सिटाडेल हनी बनी' ही सीरिजही दिग्दर्शित केली आहे. या सीरिजमध्ये समंथाचीच भूमिका होती. राज निदिमोरु नक्की कोण आहे?4 / 10राज निदिमोरु हा इंडियन-अमेरिकन फिल्ममेकर, लेखर आणि निर्माता आहे. कृष्णा डीकेसोबत त्याने फर्जी, फॅमिली मॅन सीरिज बनवल्या. 'गो गोवा गॉन','स्त्री' या सुपरहिट सिनेमांची कहाणी या जोडीने लिहिली.5 / 10राज प्रसिद्धीझोतापासून कायम दूर असतो. समंथासोबत अफेअरच्या चर्चांमुळेच तो लाईमलाइटमध्ये आला. तसंच राजचंही हे दुसरं लग्न आहे.6 / 10राजचा जन्म ४ ऑगस्ट १९७५ रोजी तिरुपति आंध्र प्रदेशमध्ये झाला. तो ५० वर्षांचा आहे. तर समंथा ३८ वर्षांची आहे. दोघांमध्ये १२ वर्षांचं अंतर आहे. 7 / 10राजने इंजिनिअरिंग केलं आहे. नंतर तो टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये काम करण्यासाठी अमेरिकेत गेला. तिथे त्याची भेट कृष्णा डीकेसोबत झाली. दोघांनी फिल्ममेकिंगसाठी सॉफ्टवेअरमधलं करिअर सोडलं. कारण दोघांचं फिल्ममेकिंग हे एकच पॅशन होतं.8 / 10राजचं पहिलं लग्न श्यामली डेसोबत झालं होतं. २०२२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. समंथासोबत त्याच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या तेव्हा श्यामलीने अनेकदा क्रिप्टिक पोस्ट शेअर केल्या.9 / 10राज आणि समंथाची पहिली भेट 'फॅमिली मॅन सीझन २'वेळी झाली. तेव्हा दोघं प्रेमात पडले. यानंतर एका वर्षात राजने श्यामलीला घटस्फोट दिला. यावरुन समंथावर दोघांचा संसार मोडण्याचा आरोपही लावला गेला.10 / 10मीडिया रिपोर्टनुसार, राजची नेटवर्थ ४५ ते ६० कोटी एवढी आहे. तर ओटीटी प्रोजेक्ट्स, प्रोडक्शन व्हेंचर्स आणि इंटरनॅशनल कोलॅबोरेशन बगता त्याची नेटवर्थ ८५ कोटी एवढीही मानली जाते.