By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:49 IST
1 / 9साऊथ अभिनेत्री पूजिता जोनालगड्डा हिने तिच्या तिच्या पर्सनल आणि वैवाहिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. नवऱ्याच्या अफेअरमुळे अभिनेत्रीचा १४ वर्षांचा संसार मोडला आहे. 2 / 9पूजिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तिने नवऱ्याच्या अफेअरबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. 3 / 9पूजिताने आरोप केला आहे की तिचा नवरा विजय गोपालचे ९ महिलांसोबत अनैतिक संबंध होते. 'एका पत्नीसाठी याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते? जिने पतीला १४ वर्ष साथ दिली. मात्र त्याने एवढा मोठा धोका दिला', असं पूजिता म्हणाली. 4 / 9जेव्हा माझा मुलगा ७ वर्षांचा होता. तेव्हाच विजयने आम्हाला सोडून दुसरं लग्न केलं होतं, असंही पूजिताने सांगितलं. 5 / 9एवढंच नव्हे तर नवऱ्याने घरातून तब्बल २.५ कोटींचं सोनंही चोरल्याचा आरोप पूजिताने केला आहे. 6 / 9आता पूजिता सिंगल मदर असून मुलाचा एकटीने सांभाळ करत आहे. पण, कधीही चुकीचा रस्ता निवडणार नसल्याचं तिने म्हटलं आहे. 7 / 9पूजिताने ७० हून अधिक तेलुगु सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही काम केलं आहे. 8 / 9पूजिताला दिल पेला मुद्दुला पुलिस या सिनेमामुळे प्रसिद्धी मिळाली. या सिनेमात तिने दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती. 9 / 9मात्र आपल्या खऱ्या आयुष्यातही असंच काहीतरी घडेल, असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं.