By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 18:18 IST
1 / 11चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी हजारो तरुण-तरुणी दररोज ऑडिशन देतात. पण कधीकधी नशीब अशा प्रकारे फळफळतं की तुम्हाला शोधावं लागत नाही, तर संधीच तुम्हाला शोधत येते.2 / 11असंच काहीसं घडलं संयुक्ता मेनन हिच्यासोबत. फेसबुकवरील एका साध्या फोटोने तिचं आयुष्यच बदलून टाकलं. 3 / 11संयुक्ताचा अभिनेत्री बनण्याचा प्रवास खूपच रंजक आहे. कॉलेजला जाण्यापूर्वी एका फोटोग्राफरने तिचा फोटो फेसबुकवर पाहिला होता. त्या फोटोमुळे तिला एका प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूटची संधी मिळाली. 4 / 11तोच फोटो एका निर्मात्याने पाहिला आणि तिला पहिल्या चित्रपटाची ऑफर दिली. कोणत्याही ऑडिशनशिवाय संयुक्ताचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.5 / 11 संयुक्ता म्हणते, 'मला या क्षेत्रात संधी सहज मिळाली, पण इथे टिकून राहण्यासाठी आणि अभिनय शिकण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली'.6 / 11 फेसबुकवरील एका फोटोमुळे जिचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला, ती संयुक्ता आता बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री काजोल आणि तब्बू यांच्यासोबत हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.7 / 11२०१६ मध्ये 'पॉपकॉर्न' या मल्याळम चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या संयुक्ताने आतापर्यंत धनुष, पवन कल्याण आणि पृथ्वीराज सुकुमारन यांसारख्या बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. 8 / 11आता ती काजोलची मुख्य भूमिका असलेल्या 'महारांगिनी: क्वीन ऑफ क्वीन्स' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवत आहे.9 / 11'मी हिंदी चित्रपट बघत मोठी झाले, त्यामुळे या इंडस्ट्रीचा भाग होणं हे माझं स्वप्न होतं,' अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.10 / 11संयुक्ता केवळ काजोलसोबतच नाही, तर विजय सेतुपती आणि तब्बू यांच्या 'स्लमडॉग' या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.11 / 11 तब्बूबाबत बोलताना संयुक्ता म्हणाली, 'तब्बूला प्रत्यक्ष पाहणं हा माझ्यासाठी एक 'फॅनगर्ल' मोमेंट होता. ती आजही तितकीच सुंदर दिसते. तिची वागणूक आणि तिचा आत्मविश्वास मला खूप प्रेरणा देतो'.