Join us
Daily Top 2Weekly Top 5

देवरकोंडा ब्रदर्स चर्चेत; विजयसारखाच 'हॅन्डसम हंक' आहे धाकटा भाऊ, रश्मिकाचा लाडका दीर आनंद काय करतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 18:19 IST

1 / 11
दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय जोडपं रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी अखेर २६ फेब्रुवारी रोजी लग्न उरकलं. या जोडप्यानं तेलुगू आणि कोडावा परंपरेनुसार उदयपूरमधील आयटीसी मेमेंटोस इथे लग्न केलंय.
2 / 11
सध्या सर्वत्र विजय आणि रश्मिकाच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. या जोडप्याच्या लग्नाच्या फोटोंवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पण, यातच विजयचा भाऊ आनंदही चर्चेत आला आहे.
3 / 11
विजयचा भाऊ आनंद देवेराकोंडाने भावाच्या लग्नावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने रश्मिकाचे 'वादिना' (वहिनीसाठी तेलुगू शब्द) म्हणून स्वागत केले. 'मला माझ्या वहिनीमध्ये सर्वात सकारात्मक आणि दयाळू व्यक्ती सापडली', असं म्हणतं त्यानं रश्मिकाचं कौतुक केलं.
4 / 11
रश्मिका मंदानाचा लाडका दीर आनंदसुद्धा मोठ्या भावाप्रमाणेच अभिनेता आहे. तेलुगू सिनेसृष्टीत तो आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय.
5 / 11
आनंद देवरकोडानं अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर नामांकित कंपनी Deloitte मध्ये काम केले. काही वर्षे अमेरिकेत नोकरी केल्यानंतर त्याने अभिनयाची आवड जोपासण्यासाठी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
6 / 11
२०१९ मध्ये आनंदने 'दोरासानी' या पीरियड लव्ह स्टोरीमधून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. जरी हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या मोठा यशस्वी ठरला नाही, तरी आनंदच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. या चित्रपटासाठी त्याने २०२० चा झी सिने अवॉर्ड्स तेलुगूमध्ये 'बेस्ट मेल डेब्यू' पुरस्कार पटकावला.
7 / 11
२०२० मध्ये त्याचा 'मिडल क्लास मेलॉडीज' हा चित्रपट थेट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर २०२१ मध्ये 'पुष्पक विमानम' आणि २०२२ मध्ये 'आहा' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या 'हायवे' या थ्रिलर चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
8 / 11
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बेबी' या रोमँटिक ड्रामा चित्रपटाने आनंदला खरी लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. त्यानंतर २०२४ मध्ये तो 'गम गम गणेशा' या कॉमेडी कॅओस चित्रपटात झळकला, ज्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
9 / 11
रश्मिकाच्या सासू आणि सासऱ्याबद्दल बोलायचं झाल तर विजयचे वडील गोवर्धन राव देवरकोंडा तेलुगू इंडस्ट्रीतील लोकप्रिय निर्माते आहेत. त्यांनी अनेक तेलुगू चित्रपटांची निर्मिती केली आहे.
10 / 11
विजयच्या आई माधवी देवरकोंडा प्रोफेशनल ट्रेनर आहेत आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळत आहेत. माधवी यांनी २०१९ मध्ये 'डियर कॉमरेड' या रश्मिका व विजय यांच्या चित्रपटात एक छोटीशी कॉलेजमधील प्राध्यापिकेची भूमिकाही साकारली होती.
11 / 11
विजय देवरकोंडाचं हैदराबादमधील जुबली हिल्समध्ये एक आलिशान घर आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विजय त्याच्या कुटुंबीयांसह इथे राहतो आणि आता रश्मिकासुद्धा याच घरी विजयसोबत राहील.
टॅग्स :विजय देवरकोंडारश्मिका मंदानाबॉलिवूड