By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:20 IST
1 / 8साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल असलेले रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. रश्मिका-विजयने काही महिन्यांपूर्वीच गुपचूप साखरपुडा केला. 2 / 8तेव्हापासूनच त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर सोशल मीडियावर पोस्ट करत रश्मिका-विजयने प्रेमाची कबुली दिली आहे. २६ फेब्रुवारीला ते दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत. 3 / 8रश्मिका-विजय हे दोघेही साऊथमधील लोकप्रिय स्टार आहेत. संपत्तीच्या बाबतीतही ते एकमेकांना तोडीस तोड आहेत. 4 / 8विजय देवराकोंडाची एकूण संपत्ती ही जवळपास ६६ ते ७० कोटींच्या आसपास आहे. तर अभिनेता एका सिनेमासाठी १२ ते १५ कोटी इतकी फी घेतो. 5 / 8ब्रँड अॅडरोसमेंटसाठी विजय देवराकोंडा जवळपास १ कोटी रुपये मानधन घेतो. तर एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी त्याला ४० लाख रुपये मिळतात. 6 / 8श्रीमंती आणि कमाईच्या बाबतीत रश्मिका मंदानाही काही कमी नाही. ती विजयला तोडीस तोड आहे. 7 / 8रश्मिकादेखील एका सिनेमासाठी ४ ते ८ कोटी इतकं मानधन घेते. जाहिरातींमधूनही ती लाखो रुपये कमवते. 8 / 8रश्मिका ६६ कोटींची मालकीण आहे. तिचं बंगळुरूमध्ये स्वत:चं घर आहे. याशिवाय अनेक महागड्या गाड्याही तिच्याकडे आहेत.