"त्याने मला 'आय लव्ह यू' म्हटलं आणि मी 'हो' म्हटलं..", अनुष्का शेट्टीने शेअर केली लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:00 IST
1 / 8दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर विशेष ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या लव्ह लाईफबद्दल तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.2 / 8अभिनेता प्रभाससोबतच्या तिच्या कथित अफेअरची चर्चा नेहमीच चर्चेत राहिली. चाहत्यांना त्यांच्या तोंडून सत्य जाणून घ्यायचे आहे, परंतु या दोघांनीही या अफवांवर नेहमीच मौन बाळगले. 3 / 8अनुष्काने रजनीकांत, विजय, नागार्जुन, प्रभास आणि अल्लू अर्जुनसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. अनुष्का शेट्टीने स्वतः तिच्या पहिल्या प्रेमाची कहाणी शेअर केली आहे. ४३ वर्षांच्या या अभिनेत्रीने तिला पहिल्यांदा प्रेमाचा प्रस्ताव कधी मिळाला, याबद्दल सांगितले.4 / 8अनुष्काने २००५ मध्ये तेलुगू चित्रपट 'सुपर'मधून पदार्पण केले. माधवनसोबतच्या तमीळ चित्रपट 'रेंडु'मधून तिची तमीळ प्रेक्षकांशी ओळख झाली. रजनीकांतसोबत 'लिंगा', विजयसोबत 'वेट्टैकारन', सूर्यासोबत 'सिंघम' अशा प्रत्येक मोठ्या स्टारसोबत तिने हिट चित्रपट दिले.5 / 8पण खरी ओळख तिला 'अरुंधती' चित्रपटातून मिळाली. यानंतर 'इंची इडुप्पझगी'मध्ये तिने असे काही केले जे कोणतीही अभिनेत्री सहसा करत नाही. तिने वजन वाढवून ही भूमिका साकारली. चित्रपट हिट झाला नसला तरी तिच्या मेहनतीचे आणि अभिनयाचे कौतुक सर्वत्र झाले.6 / 8४३ वर्षीय अनुष्का शेट्टी अजूनही अविवाहित आहे. प्रभाससोबत तिच्या लग्नाच्या अफवा पसरल्या, पण दोघेही चांगले मित्र असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नुकत्याच एका मुलाखतीत अनुष्काने तिच्या पहिल्या लव्हस्टोरीची आठवण शेअर केली.7 / 8अनुष्काने सांगितले, ''मी सहाव्या वर्गात शिकत होते. एक मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला, 'आय लव्ह यू'. त्या वयात मला त्याचा अर्थही नीट समजला नव्हता. पण त्याने जे काही सांगितले, मी फक्त 'ओके' म्हणून त्याला स्वीकारले. ही माझ्या आयुष्यातील एक सुंदर आठवण बनून राहिली आहे.''8 / 8'बाहुबली १' आणि 'बाहुबली २' च्या जबरदस्त यशानंतर अनुष्का शेट्टी काही काळ चित्रपटांपासून दूर राहिली. या मोठ्या ब्रेकनंतर ती 'मिस शेट्टी मिस्टर पोली शेट्टी'मध्ये दिसली. नुकताच रिलीज झालेल्या तिच्या 'घाटी' चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.