Join us

दोन वेळा प्रेमात धोका, धर्म बदलून केलं लग्न! संपत्तीसाठी पतीनेच घराबाहेर काढलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 16:38 IST

1 / 8
अभिनय क्षेत्रात येणं आणि यशस्वी होणं हा नशिबाचा भाग आहे. अनेक कलाकार अगदी तरुण वयातच या क्षेत्रात एन्ट्री करतात आणि त्यांच्या अभिनयाने लोकांची मने जिंकतात. अशीच एक अभिनेत्री जिने आपलं सौंदर्य, निखळ हास्य, बोलके डोळे आणि अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केलं.
2 / 8
करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्रीला वैयक्तिक आयुष्यात मात्र, मोठं दु:ख सहन करावं लागलं. ही अभिनेत्री म्हणजे श्रीविद्या. पहिल्याच सिनेमातून ही अभिनेत्री रातोरात स्टार झाली आणि नशीबच बदललं.
3 / 8
तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत आजही श्रीविद्या यांचं नाव घेतलं जातं. श्रीविद्या या एक उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना देखील होत्या. तमिळ, मल्याळम सिनेमात मोठी लोकप्रियता मिळवल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूड एन्ट्री पदार्पण केलं.
4 / 8
१९७५ मध्ये के. बालाचंदर यांच्या 'अपूर्वा रांगागल' या सिनेमात श्रीविद्या यांना कमल हासनसोबत काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात रजनीकांतदेखील प्रमुख भूमिकेत होते. त्याचदरम्यान, श्रीविद्या आणि कमल हासन यांची जवळीक वाढली होती. दोघांच्या कुटुंबियांकडूनही त्यांच्या नात्यासाठी परवानगी होती. परंतु, श्रीविद्या यांना कमल हासन अभिनेत्री वाणी गणपतीला डेट करत असल्याचं समजलं, त्यामुळे त्यांचं नातं पुढे जाऊ शकलं नाही.
5 / 8
कमल हसन यांच्याशी नातं तुटल्यानंतर श्रीविद्या सिनेसृष्टीपासून दूर झाल्या. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शक भारतन लग्न करुन संसार थाटला. पण, हे नातं देखील फार काळ टिकू शकलं नाही.
6 / 8
दोन वेळा प्रेमात धोका मिळाल्यानंतर श्रीविद्या त्यातून सावरल्या. त्यानंतर फिल्म टेक्निकल सहाय्यक जॉर्ज थॉमस यांना डेट करायला सुरुवात केली. श्रीविद्या यांना जॉर्ज यांच्याशी लग्न करायचं होतं, पण जॉर्ज यांनी अभिनेत्रीपुढे धर्म परिवर्तन करण्याची अट ठेवली होती. मग या दोघांनी १९७८ मध्ये लग्न केलं. श्रीविद्याला चित्रपट उद्योग सोडून सामान्य कौटुंबिक जीवन जगायचे होते, परंतु आर्थिक अडचणींमुळे जॉर्जने तिला चित्रपटांमध्ये काम करत राहण्यास भाग पाडले.
7 / 8
लग्नाच्या काही महिन्यांतच श्रीविद्या आणि जॉर्ज यांच्यामध्ये वाद होऊ लागले. अखेरीस साल १९८० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. जॉर्जने श्रीविद्या यांच्या संपत्तीवर कब्जा करत त्यांना घरातून बाहेर काढलं. पुढे हे प्रकरण कोर्टात गेलं न्यायलयीन लढाईनंतर अभिनेत्रीला तिची संपती परत मिळाली.
8 / 8
परंतु, २००३ मध्ये अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. मात्र, त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. १९ ऑक्टोबर २००६ मध्ये वयाच्या ५३ व्या वर्षी श्रीविद्या यांनी जगाचा निरोप घेतला.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी