Join us

'नॅचरल ब्युटी' म्हणून लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्रीनं नाकारलेली ३ कोटींची फेयरनेस क्रीमची जाहिरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:53 IST

1 / 8
अभिनेत्री साई पल्लवी सिनेइंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. ९ मे, १९९२ साली जन्मलेली साई पल्लवी अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी डॉक्टर होती. तिला नॅचरल ब्युटी म्हटलं जातं. अभिनेत्रीने एका फेयरनेस क्रिमच्या जाहिरातीला नकार दिला होता.
2 / 8
साई पल्लवी बेधडक विधानांमुळे चर्चेत येत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साई पल्लवी हिला २०१९ साली एका फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीची ऑफर मिळाली होती. ज्यासाठी तिला २-३ कोटी रुपये मानधन मिळणार होते. पण अभिनेत्रीने ही जाहिरात नाकारली आणि अशा प्रकारच्या कोणत्याच गोष्टीचं प्रमोशन करणार नसल्याचे म्हटले.
3 / 8
एका मुलाखतीत साई पल्लवीने खुलासा केला होता की, तिला जास्त मेकअप करायला आवडत नाही. तिचं म्हणणं आहे की, ती भारतीय आहे आणि तिला जो रंग मिळाला आहे, तो योग्य आहे.
4 / 8
सोशल मीडियावर तिच्या या निर्णयाचं खूप कौतुक झाले होते आणि नेटकऱ्यांनी तिच्या या निर्णयाला सर्वोत्तम निर्णय म्हटलं होतं.
5 / 8
साई पल्लवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर २००५ साली तिने 'कस्तुरी मान' सिनेमातून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
6 / 8
यानंतर साई पल्लवी काली, मिडिल क्लास, मारी, लव स्टोरी, श्याम सिंह रॉय, गार्गी, अमरन, तंडेल यासारख्या सिनेमात झळकली आहे.
7 / 8
आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर साई पल्लवी लवकरच नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' सिनेमात झळकणार आहे. यात ती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.
8 / 8
'रामायण' सिनेमात साई पल्लवीसोबत रणबीर कपूर रामच्या भूमिकेत दिसणार आहे. तर केजीएफ स्टार यश रावणाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
टॅग्स :साई पल्लवी