Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG!! जसप्रीत बुमराह पाठोपाठ अभिनेत्री अनुपमानेही घेतली सुट्टी; काय आहे ‘हॉलिडे कनेक्शन’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 16:58 IST

1 / 10
भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये खेळणार नाही. कारण अर्थातच तुम्हाला ठाऊक आहे. जसप्रीतने सुट्टी घेतलीये. जसप्रीतनेच नाही तर साऊथ अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन् ही सुद्धा सुट्टीवर आहे.
2 / 10
आता या सुट्टीचे कनेक्शन काय हे माहित नाही. पण या हॉलिडे कनेक्शनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
3 / 10
अनुपमाने मंगळवारी एक फोटो शेअर केला. ‘हॅपी हॉलिडे टू मी,’ असे लिहित तिने यासोबत स्मायलिंग इमोजी पोस्ट केला.
4 / 10
तिच्या याच पोस्टनंतर जसप्रीत व अनुपमाच्या हॉलिडे कनेक्शनची चर्चा सुरु झाली. होय, कारण जसप्रीतने लग्नासाठी सुट्टी घेतल्याचे कळतेय. जसप्रीत पाठोपाठ अनुपमानेही सुट्टीवर असल्याचे जाहिर केले आहे. आता या कनेक्शन चर्चा का होतेय, याचा अंदाज तुम्हाला आलाच असेन.
5 / 10
गेल्या अनेक दिवसांपासून अनुपमा व बुमराहच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु आहेत. आता बुमराह लग्न करणार म्हटल्यावर त्याची भावी वधू अनुपमा तर नाही ना? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
6 / 10
दोघांनीही एकत्र सुट्टी घेणे, हा योगायोग नक्कीच नाही, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. त्याचमुळे या हॉलिडे कनेक्शनची चर्चा होतेय.
7 / 10
बुमराहला आपण सगळेच ओळखतो़ पण ही अनुपमा कोण हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. अनुपमा ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
8 / 10
तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलेय. 2015 साली प्रेमम या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली.
9 / 10
2016 साली जेम्स अ‍ॅण्ड एलिस या मल्याळम सिनेमात ती झळकली. अनुपमा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.
10 / 10
अनुपमाचे मानाल तर जसप्रीत तिचा केवळ एक चांगला मित्र आहे. पण, येत्या काळात या नात्याला नेमकं कोणते वळण मिळणार का, हे पाहणे अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे.
टॅग्स :जसप्रित बुमराह