By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 11:06 IST
1 / 880 चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे फराह नाज. उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे फारहने त्या काळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.2 / 8८० च्या दशकातली टॉप अॅक्ट्रेस म्हणून फराहकडे पाहिल जातं.3 / 8अभिनेत्री तब्बूची बहीण असलेल्या फराहने बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे.4 / 8बॉलिवूडसह मल्याळम आणि तेलुगू सिनेसृष्टीतही ती विशेष लोकप्रिय आहे. 5 / 8फराहची मुख्य भूमिका असलेले अनेक चित्रपट गाजले. त्यातलाच एक म्हणजे यतीम. १९८८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट जेपी दत्ता यांनी दिग्दर्शित केला होता.6 / 8यतीम बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला त्यामुळे त्याची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या पार्टीत फराहला एका वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं.या पार्टीमध्ये जेपी दत्ता यांचे जवळचे मित्र फारुख नाडियादवालादेखील सहभागी झाले होते. या पार्टीत त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त दारु घेतली होती. 7 / 8दारुच्या नशेत त्यांनी फराहलादेखील दारु घेण्याचा आग्रह केला. मात्र, फराह वारंवार नकार देत होती. इतकंच नाही तर त्यानंतर फारुखने केलेल्या कृतीमुळे फराहने त्यांच्या कानशिलात लगावली.8 / 8साडी नेसल्यामुळे ड्रिंक घेणं अवघडल्यासारखं वाटत असेल तर मग साडी सोडून दे, असं फारुख म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर फराह प्रचंड संतापली आणि चारचौघात तिने फारुख यांच्या कानशिलात लगावली.