By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:18 IST
1 / 9साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते डॅनियल बालाजी आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने डॅनियल यांची आई आजही धक्क्यातून सावरलेली नाही. आपल्या लाडक्या मुलाच्या विरहाने त्या पूर्णपणे कोलमडून गेल्या आहेत.2 / 9डॅनियल यांनी मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकांतून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. २०२४ मध्ये वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.3 / 9हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला. डॅनियल बालाजी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या.4 / 9जेव्हा जेव्हा चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेची गरज भासायची, तेव्हा डॅनियल बालाजी यांच्याशिवाय दुसरा कोणताही उत्तम पर्याय नसायचा. ते आपल्या अभिनयाने पात्रात जीव ओतत असत.5 / 9रिपोर्ट्सनुसार, डॅनियल यांनी आपली आई राजलक्ष्मी यांच्यासाठी तब्बल ८० कोटींचा आलिशान बंगला बांधला होता. त्यांची आई याच घरात राहत होती. मात्र मुलाच्या निधनानंतर त्यांनी हे घर सोडण्याचा निर्णय घेतला.6 / 9मोठ्या बंगल्यात मुलाशिवाय राहणं आईला असह्य झालं. बंगल्याचा प्रत्येक कोपरा त्यांना डॅनियलची आठवण करून देत होता. त्यामुळे तो आलिशान बंगला सोडून त्या आता मुलाने बांधलेल्या मंदिराच्या शेजारी एका छोट्याशा झोपडीत राहू लागल्या आहेत. मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा? असं म्हटलं आहे.7 / 9डॅनियल यांनी २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एप्रिल मथथिल' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'वेट्टैयादु विलैयाडु', 'पोल्लाधवन' आणि 'वाडा चेन्नई' यांसारख्या चित्रपटांनी त्यांना विशेष ओळख मिळवून दिली. 8 / 9अभिनयात येण्यापूर्वी त्यांनी प्रोडक्शन मॅनेजर म्हणूनही काम केलं होतं. कमल हासन यांचा 'मरुथुनायकम' हा चित्रपट त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीचा भाग होता. हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही, पण याच काळात डॅनियल यांचं आयुष्य बदललं.9 / 9टीव्ही मालिकेतून आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांना आध्यात्मिक गोष्टींचीही खूप आवड होती. त्यांनी चेन्नईतील आवडी (Avadi) येथे एक मंदिरही बांधलं होतं.