Good News..! सोनम कपूर ते भारती सिंग पर्यंत, २०२२ मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या घरी हलणार पाळणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 15:54 IST
1 / 6२०२२ मध्ये या अभिनेत्री आई होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 2 / 6बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर ती आई बनणार असल्याची गुड न्यूज शेअर केली आहे, सोनमने इंस्टाग्रामवर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर करत खुशखबर दिली आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 3 / 6अभिनेत्री काजल अग्रवालने या वर्षाच्या सुरूवातीला सांगितले होते की ती आई बनणार आहे. काजलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, ज्यात तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. काजल अग्रवालने ३० ऑक्टोबर, २०२० गौतम किचलूसोबत लग्न केले होते. (फोटो: इंस्टाग्राम) 4 / 6भारती सिंग लवकरच पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. भारतीने २०१७ साली हर्ष लिंबाचिया सोबत लग्न केले होते. (फोटो: इंस्टाग्राम) 5 / 6देबिना बॅनर्जी आणि गुरमित चौधरीने फेब्रुवारीमध्ये सांगितले होते की ते लवकरच आई-बाबा होणार आहेत. गुरमितने देबिनासोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, आता आम्ही तिघे होणार आहोत. लवकरच ज्युनिअर चौधरी येणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 6 / 6कन्नड अभिनेत्री संजना गलरानीदेखील या वर्षी आई बनणार आहे. संजना गलरानीने सोशल मीडियावर आनंदाची वार्ता शेअर केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)