बॉडी शेमिंगला बळी पडणाऱ्या स्त्रियांना 'अप्सरा'ने दिला सल्ला; म्हणाली, 'जाड किंवा बारीक असणं ही..'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 08:55 IST
1 / 8मराठी कलाविश्वाची अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. उत्तम अभिनयाच्या जोरावर ती कायम चर्चेत येत असते.2 / 8अलिकडेच सोनालीने ब्लू कलरच्या मॉर्डन ड्रेसमध्ये फोटोशूट केलं. या फोटोशूटची नेटकऱ्यांमध्ये कमालीची चर्चा झाली.3 / 8सोनालीने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून त्याला दिलेलं कॅप्शन सध्या लक्षवेधी ठरत आहे. 4 / 8सोनालीने तिच्या या पोस्टमधून बॉडी शेमिंगसारख्या घटनांना बळी पडणाऱ्या महिलांसाठी एक खास सल्ला दिला आहे.5 / 8'त्या सगळ्या स्त्रियांसाठी ज्यांना त्यांच्या शरीराच्या ठेवणीवर ट्रोल करण्यात आलं आहे.- जाड किंवा बारीक असणं ही तुमची निवड आहे. तुमच्या शरीरावर प्रेम करण्याचा तुमचा अधिकार आहे. जी लोकं त्यांची मत तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष कराल. तुमच्या आनंदाला प्राधान्य द्या. ट्रोल करनेवाले कभी डरते नहीं,' असं सोनालीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.6 / 8सोनालीची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. तसंच अनेकांनी तिचं मत पटल्याचंही म्हटलं आहे.7 / 8सोनालीने या पोस्टपूर्वी आकाशी रंगाच्या साइड हाय स्लिट ड्रेस मध्ये एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ती कमालीची सुंदर दिसत होती.8 / 8सोनाली मराठीसह आता दाक्षिणात्य कलाविश्वातही सक्रीय झाली आहे. अलिकडेच ती 'मलाइकोट्टई वालिबान' या सिनेमात झळकली होती. तसंच ती आता, 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या मराठी सिनेमात दिसणार आहे.