Join us

Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णी पुन्हा अडकणार लग्नबेडीत, लंडनमध्ये घेणार सात फेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 18:58 IST

1 / 7
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) पुन्हा एकदा लग्नबेडीत अडकणार आहे.
2 / 7
सोनालीने 7 मे, २०२१ रोजी कुणाल बेनोडेकरसोबत (Kunal benodekar) दुबईतील एका मंदिरात गुपचूप लग्न केले होते.
3 / 7
आता लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनाली पुन्हा एकदा कुणालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. लंडनमध्ये हे लग्न पार पडणार आहे.
4 / 7
सोनाली आता कुटुंबियांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा लंडनमध्ये सात फेरे घेणार आहे. विशेष म्हणजे सोनाली आणि कुणालच्या लग्नाला दोघांचेही आई- बाबा उपस्थित नव्हते. त्यामुळे आता ते आई-बाबांच्या उपस्थित पुन्हा एकदा लग्न करणार आहेत.
5 / 7
जुलै महिन्यात साग्रसंगीत पद्धतीने सोनाली आणि कुणाल लग्न करणार होते. मात्र वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनालीने तिच्या वाढदिवसादिवशी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.
6 / 7
सध्या सोनालीचे मेहंदी, संगीत, हळद असे सर्व कार्यक्रम होत आहेत. तिच्या लग्नासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे मालिकेतून ब्रेक घेऊन लंडनला गेली आहे.
7 / 7
सोनालीचे चाहते तिच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो आणि अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी