नवरी नटली..! सोनाली कुलकर्णीनं लंडनमधील लग्नाचे फोटो शेअर करत आठवणींना दिला उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:28 IST
1 / 11मराठी सिनेइंडस्ट्रीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने पती कुणालसोबत लंडनमध्ये दुसऱ्यांदा लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. या लग्न सोहळ्याचे फोटो अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.2 / 11सोनाली कुलकर्णीने लग्नातील तिच्या लूकचे फोटो शेअर करत लिहिले की, नवरी नटली.3 / 11या फोटोत सोनाली कुलकर्णीचा राजेशाही थाट पाहायला मिळतो आहे.4 / 11यात सोनाली कुलकर्णीने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले आहे.5 / 11‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर तिचा लग्नसोहळ्यांची मालिका प्रदर्शित करण्यात आली. त्याची झलक सोनालीनं शेअर केलेल्या फोटोत पाहायला मिळते आहे.6 / 11सोनाली कुलकर्णी व कुणाल बेनोडेकर यांनी कोरोना काळात लग्न करून फॅन्सना सुखद धक्का दिला होता. 7 / 11हे लग्न दुबईत झालं. अगदी चार दोन लोकांच्या उपस्थितीत एका मंदिरात अगदी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता.8 / 11दुबईचं लग्न अगदी सोनाली-कुणालच्या घरच्यांनी आणि मित्र- मैत्रिणींनी व्हिडिओ कॉलवरच पाहिलं होतं. दुबईच्या लग्नात ना विधी होत्या, ना हौस मौज.9 / 11 सोनाली व कुणालनं पुन्हा एकदा विधीवत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला हा निर्णय अमलातही आला. यावेळी त्यांनी लग्नासाठी लंडनची निवड केली.10 / 11सोनाली व कुणालच्या लंडनमधील लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ आता समोर आले आहेत.‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा शाही लग्नसोहळ्याची मालिका प्रदर्शित झाली.11 / 11लंडनमध्ये सोनालीनं धुमधडाक्यात लग्न केलं. तिच्या लग्नाची संपूर्ण मालिका चाहत्यांना पाहता आली. एखाद्या मराठी अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोनाली याची पहिली मानकरी ठरली आहे.