माझ्याकडे कोणतीच गुड न्यूज नाही, म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केलेत सुंदर फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 18:08 IST
1 / 12मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे नवे ताजे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (इन्स्टाग्राम)2 / 12विशेष म्हणजे, या फोटोंपेक्षा सोनालीने या फोटोंना दिलेले कॅप्शन अधिक चर्चेत आहे.3 / 12माझ्याकडे कोणतीच गुड न्यूज नाही, असे हे फोटो शेअर करताना सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.4 / 12माझ्याकडे कोणतीच गुड न्यूज नाही, असे सोनालीने का म्हटले तर पोलका डॉट फॅशन स्टाईलचा ड्रेस आणि अनुष्का शर्मा हिच्यामुळे.5 / 12होय, अलीकडे अनुष्का शर्माने प्रेग्नंट असल्याची गुड न्यूज दिली होती. ही ‘गुड न्यूज’ देताना अनुष्काने परिधान केलेला पोलका डॉट फॅशनचा ड्रेस सोशल मीडियावर विनोदाचा विषय ठरला होता. यावरचे अनेक मीम्सही व्हायरल झाले होते.6 / 12सोनालीनेही असाच पोलका डॉट पॅटर्नसारख्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आणि ते फोटो शेअर केलेत. पण या ड्रेसमुळे ट्रोल होऊ नये, याची काळजी तिने आधीच घेतली.7 / 12सोनालीचा हा ड्रेस पोलका डॉट पॅटर्नचा नाही. खरे तर त्यावर वेगळी डिझाइन आहे. पण तरिही माझ्यायाकडे कोणतीच गोड बातमी नाही, हे तिने आधीच स्पष्ट केले.8 / 12सोनालीने आणखीही काही फोटो शेअर केलेत.9 / 12तिचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.10 / 12 सोनालीने यावर्षी साखरपुडा करत चाहत्यांना गोड बातमी दिली होती.11 / 12 लॉकडाऊन काळात सोनाली दुबईतच अडकली होती. दुबईत होणारा पती कुणाल बेनोडेकरसोबत काही महिने राहिल्यानंतर सोनाली नुकतीच मुंबईला परतली. 12 / 12मुंबईत आल्यानंतर सोनाली पुन्हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाली आहे.