By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 17:11 IST
1 / 7भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि गायक-दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचे लग्न रद्द होऊन दोन महिने उलटले. पण तरीही, त्या दोघांची अजूनही चर्चा सुरूच आहेत. दोन दिवसापूर्वी स्मृती मानधनाचा मित्र अभिनेता विज्ञान माने याने पलाशवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.2 / 7विज्ञान माने याने पलाश मुच्छल याच्याविरुद्ध ४० लाख रुपयांचा फसवणुकीचा खटला दाखल केला. पलाशने स्मृती मानधनाची फसवणूक केली असल्याचा दावाही माने यांनी एका मुलाखतीमध्ये केला. 3 / 7तो एका महिलेसोबत बेडवर पकडला होता, त्यानंतर स्मृतीच्या महिला क्रिकेटपटू मैत्रिणींनी त्याला मारहाण केली. माने यांच्या दाव्यांमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली.4 / 7स्मृतीशी ब्रेकअप झाल्यानंतर दोन महिन्यांनी, पलाशने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. पलाशने स्मृतीसोबतचा त्याचे सर्व फोटो डिलीट केले. ते फोटो त्याने आधीच काढले नव्हते. फसवणुकीचा आरोप झाल्यानंतर पलाशने हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.5 / 7इंस्टाग्राम अकाउंटवर पलाश आणि स्मृतीचे अनेक फोटो शेअर केले होते. यामध्ये त्याचा आणि स्मृतीचा महिला क्रिकेट विश्वचषक विजय साजरा करतानाचा एक फोटो होता.6 / 7विश्वचषक संपल्यानंतर काही दिवसांनी, २३ नोव्हेंबर रोजी हे जोडपे लग्न करणार होते. पण अचानक लग्न रद्द करण्यात आले. पलाशने स्मृतीची फसवणूक केल्यामुळे लग्न रद्द करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.7 / 7दोघांपैकी कोणीही या वृत्तांना दुजोरा दिला नाही. पलाश आणि स्मृतीने ८ डिसेंबर रोजी लग्न रद्द झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, आता पलाशने आचे म्हटले आहे.