Join us

Smriti Irani : फाटलेला टी-शर्ट अन् साइड रोल...; ज्योतिषाच्या 'त्या' भविष्याणीमुळे बदललं स्मृती इराणीचं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:46 IST

1 / 10
स्मृती इराणी यांनी मनोरंजन क्षेत्रासोबतच राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही त्यांची मालिका प्रचंड गाजली. यानंतर त्या राजकारणात आल्या आणि त्यांनी तिथेही आपला ठसा उमटवला.
2 / 10
स्मृती इराणी पुन्हा तुलसी विरानीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ पार्ट २ येणार आहे. या शोमधून त्यांनी त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की एके दिवशी त्या इतकं मोठं नाव कमावतील.
3 / 10
ज्योतिषाच्या एका भविष्याणीमुळे स्मृती यांचं आयुष्य अचानक बदललं. आज तकशी झालेल्या संभाषणात त्यांनी ऑडिशनचा किस्सा सांगितला आहे.
4 / 10
स्मृती यांनी सांगितलं की, 'जेव्हा त्या ऑडिशन देण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा एका ज्योतिष्याने त्यांना पाहिलं आणि या मुलीला थांबवा असं एकताला सांगितलं. जनार्दन असं त्यांचं नाव असल्याचं मी ऐकलं होतं. त्यांनी मला रिसेप्शनवर उभं असलेलं पाहिले. ते एकतासोबत ऑफिसमध्ये बसले होते.'
5 / 10
'ज्योतिषांनी सांगितलं की हिला थांबवा, ही आयुष्यात खूप पुढे जाईल. तेव्हा मी अस्ताव्यस्त जीन्स, फाटलेला टी-शर्ट घालून आणि बॅग घेऊन काम मागायला आले होते. तेव्हा मी ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ साठी गेले नव्हते.'
6 / 10
'मी 'घर एक मंदिर' या सोनी टीव्हीवरील एका शोमध्ये थर्ड कॅरेक्टर करण्यासाठी गेले होते. तेव्हा एकता बाहेर आली आणि तिने जुनं कॉन्ट्रॅक्ट फाडलं आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट दिलं. तू नवीन भूमिका साकारशील असं मला सांगितलं.'
7 / 10
'मला त्यावेळी फक्त पगाराची चिंता होती. मला फक्त नोकरी हवी होती, कारण पैशांची मोठी कमतरता होती. पण एकताला खूप विश्वास होता की, आपण इतिहास घडवू. पण माझं लक्ष फक्त पगारावर होतं' असं स्मृती यांनी म्हटलं.
8 / 10
स्मृती यांनी पुढे सांगितलं की, ' मेकअप मॅनकडे त्यावेळी कार होती, पण मी ऑटोने जायची. तर तो मला म्हणायचा की मॅडम, तुम्ही एवढ्या मोठ्या स्टार आहात, तुम्ही ऑटोने येता आणि मी गाडीने येतो. मी म्हणायचे की, काय फरक पडतो, मग तो म्हणाला की नाही, मला इतरांसमोर लाज वाटते.'
9 / 10
'या टीव्ही शोमधून सर्वांना चांगले पैसे मिळाले. दिल्लीमध्ये राहत असताना मी नेहमीच एक दिवस जग मला ओळखेल असं म्हणायचे' असं देखील स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
10 / 10
टॅग्स :स्मृती इराणीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार