By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:46 IST
1 / 7संपत्ती ४१४ कोटी. इतकी श्रीमंती असूनही बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध गायक साध्या टी शर्टमध्ये रेल्वे स्टेशनवर दिसला. त्याला पाहून सर्वच थक्क झाले.2 / 7हा गायक दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे अरिजीत सिंह. अरिजीतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत अरिजीत अत्यंत साध्या अवतारात रेल्वे स्टेशनवर दिसला.3 / 7निळ्या रंगाचं शर्ट, जीन्स आणि पायात स्लीपर अशा अत्यंत साध्या अवतारात अरिजीतला पाहून त्याचे चाहते थक्क झाले. जियागंज रेल्वे स्टेशनच्या इथे चाहत्यांनी अरिजीतला कॅमेरात कैद केलं4 / 7अरिजीतला अशा रुपात पाहून चाहत्यांनी त्याच्या साधेपणाचं आणि खरेपणाचं कौतुक केलं. आपल्या बाजूने गेला तरीही कळणार नाही, अशा प्रतिक्रिया देत चाहत्यांनी अरिजीतच्या व्यक्तिमत्वाबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय.5 / 7अरिजीतने काही दिवसांपूर्वीच पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर अरिजीत जाहीर इव्हेंटमध्ये फार कमीच दिसतोय. म्यूझिक कॉन्सर्ट वगळता अरिजीत कोणत्याही कार्यक्रमांना दिसत नाही.6 / 7''इतकी वर्षे श्रोते म्हणून मला जे प्रेम दिले, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. मला हे सांगताना आनंद होत आहे की, आता मी इथून पुढे 'प्लेबॅक सिंगर' म्हणून कोणतेही नवीन काम घेणार नाहीये. मी हा प्रवास इथेच थांबवत आहे. हा प्रवास अत्यंत सुंदर होता.', अशी पोस्ट लिहून अरिजीतने त्याची निवृत्ती जाहीर केली होती.7 / 7बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, लोकप्रियता ही मिळणं सोपी गोष्ट नाही. त्यासाठी अथक मेहनत आणि संघर्ष करावा लागतो. एकदा ही प्रसिद्धी मिळाली की ती टिकवून ठेवणंही मोठी गोष्ट आहे. काहीजण या प्रसिद्धीत रमतात तर काहीजण मात्र अरिजीतसारखे दूर जातात.