Join us

Photos: लक्झरी किचनपासून जीमपर्यंत! शिल्पा शेट्टीची नवीन आलिशान व्हॅनिटी व्हॅन पाहिली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 11:52 IST

1 / 11
बॉलिवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी (shilpa shetty). अलिकडेच शिल्पाने तिचा ४७ वा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे तिचा फिटनेस पाहून तिने वयाची ४५ वर्ष ओलांडली आहेत यावर कोणी विश्वास ठेवणार नाही.
2 / 11
उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी शिल्पा अनेकदा तिच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असते. मध्यंतरी शिल्पा तिचा पती राज कुंद्रा याच्यामुळे चर्चेत आली होती.
3 / 11
गेल्या काही काळात शिल्पा कोणत्याही मोठ्या चित्रपटात झळकलेली नाही. मात्र, काही रिअॅलिटी शो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात सातत्याने राहिली.
4 / 11
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या शिल्पाने तिच्या वाढदिवशी स्वत:लाच एक महागडं गिफ्ट भेट म्हणून दिलं आहे.
5 / 11
शिल्पाने तिच्या ४७ वा वाढदिवशी एक नवीन व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली. ही व्हॅन प्रचंड आलिशान असून सध्या सोशल मीडियावर ती चर्चेत येत आहे.
6 / 11
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी (Viral Bhayani) यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या व्हॅनिटी व्हॅनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
7 / 11
शिल्पाच्या नव्या व्हॅनिटीमध्ये मेकअप रुमपासून ते जीमपर्यंत प्रत्येक गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे.
8 / 11
शिल्पाची व्हॅनिटी व्हॅन प्रचंड लक्झरी असून यात बाथरुम, किचन स्टिंग रुमचादेखील समावेश करण्यात आला आहे.
9 / 11
शिल्पाने अत्यंत विचारपूर्वक तिची व्हॅनिटी व्हॅन तयार केली आहे. त्यामुळे अगदी घराप्रमाणे ही व्हॅन वाटते.
10 / 11
शिल्पाच्या व्हॅनिटीमध्ये म़ॉड्युलर किचनदेखील आहे.
11 / 11
शिल्पा फिटनेस फ्रिक असल्यामुळे फावल्या वेळात वर्कआऊट करता यावं यासाठी तिने व्हॅनमध्येच एक छोटीशी जागा वर्कआऊटसाठी तयार केली आहे.
टॅग्स :शिल्पा शेट्टीसेलिब्रिटीबॉलिवूड