Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुशांतला ठिक करणं बनलं होतं रियाचं मिशन, तिने प्रेमात सगळं केलं' - शिबानी दांडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 15:08 IST

1 / 10
सुशांत सिंह राजपूत केसमध्ये मुख्य आरोपी मानली जाणारी रिया चक्रवर्तीला आता इंडस्ट्रीतून अनेकांचा सपोर्ट मिळतोय. अनेक बॉलिवूड कलाकारांनी आता रियाला खुलेआम सपोर्ट करणं सुरू केलंय. यात अभिनेत्री शिबानी दांडेकरने रियाची साथ दिली आहे. शिबानी रियाची मैत्रीणही आहे. शिबानीने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत रिया आणि सुशांतच्या नात्याबाबत आणि सुशांतच्या आजाराबाबत काही खुलासे केले आहेत.
2 / 10
शिबानीला विचारण्यात आलं की, रियाने तिला सुशांतला डेट करत असल्याबाबत कधी सांगितलं. यावर शिबानी सांगितले की, काही महिन्यांपूर्वीच सांगितले. तारीख आठवत नाही. पण ते दोघे काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
3 / 10
'मला फक्त इतकं आठवतं की, मी रियाला कधीच असं पाहिलं नाही. ती फार मनमौजी- आनंदी मुलगी होती. ती प्रेमात होती. मी रियात बदल पाहिलाय. मला माहीत होतं की, ती सुशांतसोबत आहे'.
4 / 10
'मला हेही माहीत होतं की, सुशांतची तब्येत ठिक नाही. रियाने सुशांतची प्रायव्हसी कायम ठेवण्यासाठी खूपकाही केलं होतं. रियाने सुशांतला प्रोजेक्ट करण्यासाठी खूप काही केलं आहे. कारण मेंटल हेल्थ फार पर्सनल आहे'.
5 / 10
'तुम्ही मेंटल हेल्थ बोलत राहू शकत नाही. तो पब्लिक फिगर होता. रियाने सुशांतच्या वाईट काळात ते सगळं केलं जे तिला करता आलं. ती सुशांतसोबत जेवढं राहू शकत होती राहिली. त्याच्या प्रायव्हसीचा देखील सन्मान केला'.
6 / 10
शिबानीने सांगितले की, रियाने तिला सुशांतच्या आजाराबाबत सांगितलं होतं. सुशांतला ठिक करणं, त्याची काळजी घेणं हे रियासाठी एकप्रकारे मिशन झालं होतं. जेव्हा एखाद्याचा पार्टनर मेंटल हेल्थमधून तेव्हा त्याला हॅंडल करणं फार अवघड असतं.
7 / 10
'पण रियाच्या एका भागाला मदतीची गरज होती. तिला तिच्या मित्रांसोबत बोलायचं होतं. पण तुम्ही पार्टनरची काळजी घेण्यात इतके गुंतले जाता की, तुम्ही स्वत:ही ती लढाई लढत असता. रिया फार स्ट्रॉंग होती. मी तिला ती १६ वर्षांची असतानापासून ओळखते'.
8 / 10
रियाने सुशांतच्या मेंटल हेल्थबाबत काय सांगितले होते? यावर शिबानीने सांगितले की, कदाचित १ वर्षाआधी रियाने सांगितले होते की, सुशांत वेगवेगळ्या समस्यांतून जातोय. जे डील करणं फार अवघड आहे. फार उतार-चढाव आहेत. कधी सगळं चांगलं असतं तर कधी सगळं बिघडतं. गोष्टी अनप्रेडिक्टेबल असतात.
9 / 10
शिबानी म्हणाली की, सुशांत रियाच्या आयुष्यातील प्रेम होता. मी जेव्हा दोघांना सोबत पाहिलं तेव्हा त्यांचं प्रेम स्पष्टपणे दिसत होतं. तुम्ही सहजपणे त्यांना प्रेमात बघू शकत होतात.
10 / 10
शिबानीने सांगितले की, तिला नव्हतं माहीत की, रियाने ८ जूनला सुशांतचं घर सोडलं. शिबानी आणि रिया यांच्यात ८-१४ जून दरम्यान काहीच बोलणं झालं नाही.
टॅग्स :शिबानी दांडेकररिया चक्रवर्ती