By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 16:28 IST
1 / 8‘बिग बॉस 13’मधून घराघरात पोहोचलेली शहनाज गिल हिचे लाखो फॅन्स आहेत. सध्या तिच्या फोटोशूटची चर्चा आहे.2 / 8होय, शहनाजने चक्क चिखलात फोटोशूट केलं. या फोटोशूटचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.3 / 8या फोटोत शहनाज चिखलात लोळताना दिसते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.4 / 8स्पा टाईम, असं कॅप्शन देत शहनाजने हे फोटो शेअर केले आहेत आणि चाहत्यांना ते भलतेच आवडले आहेत.5 / 8चाहते तिच्या क्यूटनेसचे ‘दिवाने’ झाले आहेत. छोटूशी क्यूट मुलगी, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे तर काहींनी तिला डाऊन टू अर्थ म्हटलं आहे.6 / 8मम्मी मारेगी, किचड में खेल रहे हो न? अशी मजेशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. एकंदर शहनाजच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.7 / 8केवळ 2 तासांत 4 लाखांवर लोकांनी या फोटोंना लाइक्स केलं आहे. लवकरच शहनाजचा बॉलिवूड डेब्यू होतोय.8 / 8आत्तापर्यंत शहनाज पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत सक्रीय होती. पण आता बॉलिवूड सिनेमात ती दिसणार आहे. सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दीवाली’ या सिनेमात तिची वर्णी लागली आहे.